टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज (9 जून) वादळी वाऱ्यासह मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास 25 ते 30 जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. (Maharashtra Rain Updates Yellow Alert)

मुंबई, ठाणे, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह चांगल्या पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरात मान्सून सक्रिय असून मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. (Maharashtra Rain Updates)

पुढील जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट- (Maharashtra Rain Updates Yellow Alert)

 

  • मुंबई
  • ठाणे
  • पालघर
    रायगड
    रत्नागिरी
    सिंधुदुर्ग
    पुणे
  • सातारा
  • सांगली
  • कोल्हापूर
  • सोलापूर
    नाशिक
  • अहमदनगर
  • धुळे
    नंदुरबार
    बीड
  • परभणी
    लातूर
  • धाराशिव
  • नांदेड
  • हिंगोली
    अकोला
  • अमरावती
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • भंडारा
  • गोंदिया
  • वर्धा
  • वाशीम
    यवतमाळ

जालन्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी- (Rain In Jalna)

जालना शहर आणि परिसरात मध्यरात्री मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये दीड ते दोन तास जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. यंदाच्या हंगामातील मान्सूनपूर्व पावसाची ही पहिलीच दमदार बॅटिंग ठरली. रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवरून पाणी वाहताना दिसले. हवामान विभागाने कालच येलो अलर्ट जारी केला होता. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

12 ते 19 जूनच्या दरम्यान मान्सूनने मराठवाडा व्यापणार- (Marathwada Rain Updates)

महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मान्सून सक्रिय झाला असला तरी मराठवाड्यात यंदा मान्सूनचे आगमन उशिराने होण्याची शक्यता असल्याचा अंदाज परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी व्यक्त केला आहे.सध्या मराठवाड्यात मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली अनुकूल वातावरणीय परिस्थिती निर्माण झालेली नाही.त्यामुळे मान्सूनला मराठवाडा व्यापण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो. 12 ते 18 जून दरम्यान मान्सून मराठवाड्यात दाखल होऊन संपूर्ण विभाग व्यापण्यास पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पुरेसा व समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. अपुऱ्या पावसावर केलेली पेरणी धोकादायक ठरू शकते व दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे करण्याचा सल्ला डॉ डाखोरे यांनी दिला आहे.

राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी – (Maharashtra Weather Updates)

मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही. दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Rahul Gandhi Chhatron Ki Goonj: पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ची जोरदार तयारी; बाराशे पोलिसांचा बंदोबस्त, कसा असणार कार्यक्रम? A टू Z माहिती

आश्रमशाळेतील तीन विद्यार्थींनीचा मृत्यू, महाराष्ट्रातील हादरवून सोडणारी घटना

महायुतीत पुन्हा धुसफूस ? शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळेच आज भाजप सत्तेत, त्या पोस्टने सगळंच बाहेर आलं

खरी शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी रंजक वळणावर, आज काय घडणार?

शिंदेंकडे असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह गोठवणार का? आज सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार