मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत, निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात गेल्या 4 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) बिगुल अखेर आज 4 नोव्हेंबर रोजी वाजला. त्यानुसार, राज्यात 2 डिसेंबरला मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh waghmare) यांनी याबाबतची घोषणा केली. त्यामुळे पुढील 1 महिन्यात नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम संपुष्टात येणार असल्याचे दिसून येते. 10 नोव्हेंबरपासून उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 17 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे. त्यामुळे, राजकीय पक्षांना पुढील 8 दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित करावी लागणार आहेत. दरम्यान, आजपासून, 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसंदर्भात आहे. यावेळी निवडणुकीस पात्र असलेल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. या माध्यमातून एकूण 6हजार 859 सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे. ज्या 246 नगर परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे, त्यामध्ये दहा नवीन नगरपरिषदाांचा समावेश आहे. तर दुसरीकडे 42 नगर पंचायतींसाठी निवडणूक होत आहे. यात 15 नवीन नगरपंचायतींचा समावेश आहे, तर अजून 105 नगर पंचायतीची अजून मुदत संपलेली नाहीये.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे
1. राज्य निवडणूक आयोगाने सांगितले की, ही पत्रकार परिषद नगरपरिषद आणि नगरपंचायत समित्यांबाबत आहेत, अशी माहिती आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे यांनी दिली. त्यामुळे, महापालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका कधी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे
2. राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 147 नगर पंचायतींपैकी 42 नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.
3. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी एकूण 1 कोटी 7 लाख 376 मतदार आहेत, त्यासाठी 13 हजार 355 मतदान केंद्र असणार आहेत. या निवडणुका देखील ईव्हीएमद्वारे होणार आहेत, अशी माहितीही आयोगाने दिली. तसेच,व्हीव्हीपॅटची सुविधा उपलब्ध नसणार, असेही स्पष्ट केले.
4. नगरपरिषदांसाठी सदस्य संख्या 20 ते 75 एवढी असून आयोगाने दिलेल्या खर्चानुसार, नगराध्यक्षपदासाठी 15 लाख खर्चाची मर्यादा असणार आहे, तर सदस्यांसाठी खर्च मर्यादा ही 7 लाख रुपये असणार आहे.
5. राज्यातील दुबार मतदाराबाबत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतल्याचे दिनेश वाघमारे यांनी सांगितलं. दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार असेल. दुबार मतदाराने प्रतिसाद न दिल्यास नाव रद्द होईल. अधिकारी संपर्क साधून एक नाव रद्द करतील, तसेच इतर कोणत्या ठिकाणी मतदान केले नाही, असे डिक्लेरेशन मतदाराकडून घेतले जाईल.
6. मतदारांच्या सोयीसाठी नवीन अॅप देखील निवडणूक आयोगाने सुरू केलं आहे. त्यामुळे, मतदारांना डिजिटल पद्धतीने आपलं नाव मतदार यादीत शोधणे सहज शक्य होणार आहे.
7. राज्यातील निवडणुकांमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 32 कॅम्पेन्स राबवल्या जाणार आहेत, दिव्यांग मतदार, तान्या बाळासहच्या स्त्रिया, ज्येष्ठांना मतदानात प्राधान्य देण्यात येईल. तर, काही मतदार केंद्र गुलाबी असतील, त्यात सर्व अधिकारी महिला असणार आहेत.
8.
असे असेल निवडणुकीचे टाईमटेबल
नामनिर्देशन पत्र – 10 नोव्हेंबर
अंतिम मुदत – 17 नोव्हेंबर
छाननी – 18 नोव्हेंबर
अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
संबंधित बातम्या
                        
                        
                        
                        
                        निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
मतदान – 2 डिसेंबर
निकाल – 3 डिसेंबर
विभागनिहाय
नगरपरिषद-नगरपंचायती
निवडणूक
कोकण – 27
नाशिक -49
पुणे – 60
संभाजीनगर – 52
अमरावती – 45
नागपूर – 55

				
															


