टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलेंडरबाबत सरकारचा मोठा निर्णय, गॅस कमी दिवस पुरणार, नेमकं कारण काय?

LPG Gas Cylinder: इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे सध्या जगभरात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. भारतात घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरबाबत सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला.

LPG Gas Cylinder: घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात महत्वाचा बदल करण्याचे सरकारने ठरवले आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर (Gas Cylinder) नागरिकांना आता अर्ध्याच वजनाचा मिळणार आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर (LPG Gas) 14.2 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येतो. मात्र, आता हा घरगुती वापराचा गॅस 8 ते 10 किलोच्या प्रमाणात नागरिकांना देण्यात येणार आहे. सिलेंडर तोच राहणार आहे. मात्र, त्यामध्ये गॅस आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्याचे आदेश गॅस कंपन्यांना देण्यात आलेत. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाणार आहेत. युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या भरुन तयार असलेले 14.2  किलोचे सिलेंडर संपल्यानंतर नवीन सिलेंडर आठ ते दहा किलोच्या प्रमाणात भरण्यात येणार आहेत. यापुढे गॅस सिलेंडर कमी वजनाचे असल्याने ते साहजिकच कमी दिवस पुरणार आहेत. त्यामुळे सामान्य घरातील दैनंदिन गणित बिघडणार आहे. यावर सामान्य नागरिक कशाप्रकारे व्यक्त होणार, हे बघावे लागेल. याशिवाय, कमी वजनाच्या या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत किती असणार, याकडेही सगळ्यांच्या नजरा आहेत. (Maharashtra Gas Shortage)

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल हे युद्ध दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये इस्रायलने इराणमधील गॅस फिल्ड आणि खनिज तेलाचे साठे असलेल्या परिसरांमध्ये हवाई हल्ले केले आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा असलेल्या परिसराला लक्ष्य केले आहे. यामुळे युद्ध संपल्यानंतरही या सुविधा पूर्ववत होण्यासाठी बराच वेळ जावा लागेल. त्यामुळे पुढील काही महिने जगभरात गॅसची टंचाई असेल, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये एलपीजी गॅसच्या तुटवड्याच्या भीतीने नागरिकांनी अनेक ठिकाणी गॅस एजन्सीबाहेर रांगा लावल्याचे दिसून आले होते. सरकारने वारंवार आवाहन करुनही नागरिकांना घरगुती सिलेंडर मिळणार की नाही, याबाबत धास्ती कायम आहे. दरम्यान, गॅसच्या तुटवड्यामुळे सरकारने व्यावसायिक वापराच्या एलपीजीसाठी गॅस पुरवठा बंद केला होता. त्यामुले हॉटेल इंडस्ट्रीवर गंडांतर ओढवले होते. मात्र, आता  मध्यपूर्वेतील (इराण-इस्त्रायल) युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅस टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व्यावसायिक LPG पुरवठ्यात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील हॉटेल्स, ढाबे आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळणार असून, वाढीव पुरवठा तत्काळ लागू करण्यात आला आहे.

Iran America War: आखाती देशातील युद्धामुळे मिनरल बॉटलच्या व्यवसायावर परिणाम, दरामध्ये झाली वाढ 

आखाती देशातील युद्धाचा परिणाम भारतातील व्यवसायावर झाले आहेत, नांदेडमधील मिनरल पाणी बॉटल तयार करणाऱ्या व्यवसायावर याचे परिणाम दिसून येत आहेत. बॉटल साठी लागणारे रॉ मटेरीयलची आयात बंद आहे.प्रीफॉर्म, कॅप, लेबल, रॅपर रोल यांचे 60 टक्क्याने दर वाढले आहेत. त्यामुळे बॉटलीच्या दरात वाढ झाली आहे. मात्र याचा फटका सामान्य नागरिकांना बसणार नाही तर रिटेलर आणि डीलर यांना बसणार आहे. पूर्वी 85-90 रुपयांना मिळणारे पाण्याचे बॉक्स आज 100-120 रुपयांना विक्री होतं आहेत. दरम्यान अशीच युद्धाची परिस्थिती राहिली तर व्यवसाय बंद होण्याची भीती मिनरल बॉटल व्यावसायिक शैलेश कऱ्हाळे यांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा ‘महाराष्ट्र केसरी’; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव

Solapur Rain : महाराष्ट्रावर ‘अवकाळी’ संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; बळीराजाला रडू कोसळलं

103 Teachers Suspended in Class 10 and 12 Mass Copying

राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई

17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी महाराष्ट्रावर मोठं संकट, 12 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, प्रशासनाकडून…

अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी वातावरण तापले, रोहित पवारानंतर जय पवारही मैदानात ?

अजित पवारांच्या विमानाचा ‘तो’ पायलट जिवंत आहे का, अपघातामागे सुनियोजित कट? अमोल मिटकरींचा गंभीर आरोप