टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी

ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे, आता या योजेनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे. आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे एकूण सात हाफ्ते जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी उलटून गेला तरी देखील अद्याप आठवा हाफ्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाहीये. तसेच जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या हाफ्त्यामध्ये वाढ करून महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता फेब्रुवारीचा हाफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार? आणि 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.

लाडकी बहिण योजनेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे फेब्रुवारी संपून मार्च महिना लागला मात्र अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. मात्र लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी आहे, ती म्हणजे येत्या 7 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार आणि मार्च महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत. सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या तटकरे? 

‘लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट ! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.

2100 रुपये कधीपासून मिळणार

दरम्यान सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळू शकतात.

ही बातमी वाचा: 

“धनंजय मुंडेंनी यापूर्वीच राजीनामा द्यायला हवा होता”- पंकजा मुंडे

सोलापूर : अकलूजमध्ये भाजपची शाखा सुरू केल्याबद्दल मारहाण

सांगोला तालुक्यातील माण नदीवरील सर्व बंधारे त्वरित भरून द्यावेत; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रशासनाला आदेश

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 23 वा हप्ता अडकणार? महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकऱ्यांनो, झटपट करा हे काम

Gold Price Today : सराफा बाजारात मोठी घडामोड, युद्धविरामानंतर 3 दिवसांनी… सोन्याचे आजचे दर…

Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

Eknath Shinde Shivsena: ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंना भेटल्याची आवई उठताच खासदारांच्या धडाधड प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले…

Operation Tiger: विकली जाणारी औलाद… ‘ऑपरेशन टायगर’ चे सावट, अरविंद सावंत यांची सर्वात जळजळीत प्रतिक्रिया

एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड