टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा, एप्रिलच्या हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याची रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana April Installment मुंबई : महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या एप्रिल महिन्याची रक्कम देखील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीनं लाडक्या बहिणींच्या खात्यात काल मार्च महिन्याची रक्कम जमा करण्यात आली होती. आज काही लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन दिवसात 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे.

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज

राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहिणी मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा करत होत्या. फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यात 24 मार्चला जमा करण्यात आली होती. त्यानंतर लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या रकमेसाठी वाट पाहावी लागली होती. अखेर राज्य सरकारकडून 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वर्ग करण्यात आल्यानं लाभार्थी महिलांना दिलासा मिळाला आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये दोन दिवसांमध्ये जमा झाले  आहेत.

लाडक्या बहिणींची संख्या घटली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर सुरु केली होती. या योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून करण्यात आली आहे. तेव्हापासून दरमहा लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. या योजनेचा निकष निश्चित करताना शासनानं लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक असू नये असं निश्चित केलं होतं. याशिवाय इतर अटी देखील या योजनेसाठी निश्चित करण्यात आल्या होत्या. या योजनेमुळं महायुती सरकारला मोठं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांना मिळावा यासाठी शासनाकडून ई केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. त्यानंतर काही महिलांनी शासकीय नोकरी संदर्भातील चुकीचे पर्याय निवडल्यानं त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सुरुवातीच्या लाभार्थी महिलांची संख्या 2 कोटी 46 लाखांच्या दरम्यान होती. ही संख्या फेब्रुवारी 2026 पर्यंत 1 कोटी 76 लाखांपर्यंत खाली आली. म्हणजेच जवळपास 70 लाख लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. वारंवार मुदतवाढ देऊन देखील त्यांनी ई केवायसी पूर्ण न केल्यानं त्यांना योजनेतून वगळण्यात आलं.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now