टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ladki Bahin Yojana : 68 लाख लाडक्या बहिणींनी धरलं डोकं; खात्यावर नाही जमा होणार रक्कम, अपात्रतेच्या यादीत तुमचं नाव नाही ना?

On: April 16, 2026 12:17 PM
Follow Us:

Ladki Bahin Yojana Latest Update :  महाराष्ट्र राज्य शासनानं राबवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं अनेक महिलांना आर्थिक सहाय्य केलं. मात्र, वेळेनुरुप या योजनेतील काही निकषही बदलण्यात आले.

Ladki Bahin Yojana Latest Update : विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीला प्रचंड यश मिळवून देणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील गरजू महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाकडून प्रतिमहिना महिलांच्या खात्यावर 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात करण्यात आली. ही योजना सुरू झाली आणि लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. मात्र काळानुरुप योजनेतील निकष आणि पात्रतेच्या अटींमध्ये न बसल्यानं काही महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीय. काही महिलांचं नाव अपात्रता यादीत आलं असल्यानं त्यांच्या खात्यावर योजनेचा हफ्ता जमा होणार नसून, हा आकडा 68 लाखांवर गेल्याची माहिती आहे.

68 लाख लाडक्या बहिणी अपात्र… 

काही महिन्यांपूर्वी प्रचंड लाभार्थी संख्या असणाऱ्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता मात्र लाभार्थ्यांची संख्या घटली असून अपात्र नावांमध्ये आणखी भर पडली आहे. योजनेसाठी पात्रता निकष निर्धारित करण्यात आले असून, बऱ्याच महिला या निकषांमध्ये बसत नसल्यानंच त्यांना योजनेचा लाभ नाकारण्यात येत आहे.

योजना सुरू झाली त्यावेळी सरसकट सर्वत महिलांना आर्थिक लाभ मिळाला. 21 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर योजनेसाठी आलेल्या अर्जांची छाननी आणि पुनर्पडताळणी करण्यात आली. जुलै 2025 पर्यंत 26.34 लाख महिलांचे अर्ज योजनेतून बाद करण्यात आले, जो आकडा आता 68 लाखांवर पोहोचला आहे. किंबहुना सुरुवातीला या योजनेमध्ये जिथं एकूण लाभार्थींची संख्या 2.47 कोटी इतकी होती, तीच संख्या आता थेट 1.7 कोटींवर पोहोचली आहे. मुदतवाढ देऊनही केवायसी न करणं, हेसुद्धा अर्जदारांना अपात्र ठरवण्यामागचं एक महत्त्वाचं कारण ठरत आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला अपात्र ठरू शकतात? 

  • इतरेतर सरकारी योजनांचा लाभ सुरू असल्यास अर्जदार महिला अपात्र ठरतात.
  • शासकिय सेवेतील महिला योजनेस अपात्र
  • कुटुंबातील कोणा व्यक्तीकडे चारचाकी वाहन असल्यास योजनेस अपात्र
  • कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक असल्यास योजनेस अपात्र

महत्त्वाचे मुद्दे

  1. अर्जदारांना अपात्र ठरवण्यामागचं एक महत्त्वाचं कारण
  2. 68 लाख लाडक्या बहिणी अपात्र…
  3. शासकिय सेवेतील महिला योजनेस अपात्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now