टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

केएल राहुलचं दीडशतक, 150 धावा करणारा पहिला भारतीय, अभिषेक शर्माचा रेकॉर्ड ब्रेक

आयपीएल स्पर्धेतील 35व्या सामन्यात केएल राहुलचा झंझावात पाहायला मिळाला. त्याने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील तिसरी मोठी धावसंख्या केली. इतकंच काय तर अभिषेक शर्माचा विक्रमही मोडीत काढला.

केएल राहुलचं दीडशतक, 150 धावा करणारा पहिला भारतीय, अभिषेक शर्माचा रेकॉर्ड ब्रेक

आयपीएल 2026 स्पर्धेत आता विक्रम रचले आणि मोडले जाण्याची प्रक्रिया झपाट्याने सुरू आहे. प्रत्येक सामन्यात काही ना काही विक्रम रचला आणि मोडला जात आहे. आयपीएल स्पर्धेतील 35व्या सामन्यात असंच काहीसं घडलं. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात केएल राहुलने पंजाब किंग्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने 67 चेंडूत नाबाद 152 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 9 षटकारांसह 226.87 च्या स्ट्राईक रेटने दीडशतकी खेळी केली. त्याने या खेळीसह अनेक मोडीत काढले आणि रचले. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलने अनेक विक्रमांना गवसणी घतली.

आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात केएल राहुलने तिसऱ्या क्रमांकाची सर्वात्तम धावसंख्या केली. या यादीत ख्रिस गेल नाबाद 175 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ब्रँडन मॅकल्युम याने नाबाद 158 धावांची खेळी केली. आता या यादीतील तिसऱ्या क्रमांकावर केएल राहुलची नोंद झाली असून त्याने नाबाद 152 धावा केल्या. इतकंच काय तर त्याने मागच्या पर्वात 141 धावा करणाऱ्या अभिषेक शर्माचा विक्रम मोडीत काढला. भारतीय खेळाडू म्हणून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून केएल राहुलने मान मिळवला आहे.

टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारताकडून 150हून अधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी तिलक वर्माने हैदराबाद विरुद्ध मेघालय सामन्यात 151 धावा केल्या होत्या. मात्र आता केएल राहुल टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. म्हणजेच टी20 क्रिकेटमधील तिलक वर्माचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करत केएल राहुलच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली आहे. त्याने 7 सामन्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 357 धावा केल्या. यासह विराट कोहलीच्या डोक्यावरील ऑरेंज कॅप खेचून घेतली.

केएल राहुल म्हणाला की, ‘मला वाटतं पहिल्या 70-80 धावांपर्यंत, मी फारसा पूर्वनियोजित विचार करत नव्हतो. चौकार मारून गोलंदाजांवर दबाव टाकण्याच्याच मानसिकतेत मी होतो. योग्य क्रिकेट फटके खेळणे ही माझी नेहमीच ताकद आहे आणि मी त्यावरच विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होतो की माझ्या संघाला 250 धावांच्या पुढे नेण्यासाठी ते पुरेसे आहे आणि मी तेच करत राहिलो. फक्त शेवटच्या टप्प्यात मी पूर्वनियोजित विचार करत होतो आणि जेव्हा क्षेत्ररक्षण लावलेलं असतं, जेव्हा गोलंदाज बाहेरच्या बाजूला किंवा फिरकी गोलंदाजांसाठी क्षेत्ररक्षण निवडतात, तेव्हा पुढे काय होणार आहे याची तुम्हाला कल्पना असते.’

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now