Karnataka Crime News: 100 जणांचे मृतदेह दफन केले; सफाई कर्मचाऱ्याच्या दाव्यानं देश हादरला

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Karnataka Crime News: कर्नाटकमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका सफाई कर्मचाऱ्याने तब्बल 100 मृतदेह पुरल्याचा दावा केल्यानं संपूर्ण कर्नाटकासह देश हादरला आहे.

Karnataka Crime News: कर्नाटकच्या बेलथांगडी न्यायालयात 11 जुलै रोजी नेहमीप्रमाणे काम सुरू होते. अचानक न्यायालयाच्या परिसरात गर्दी वाढली. लोकांना काही समजण्यापूर्वीच कडक बंदोबस्तात एक व्यक्ती न्यायालयाच्या आवारात शिरला. पूर्णपणे काळ्या कपड्यात झाकलेल्या त्या व्यक्तीच्या मागे वकिलांची फौज उभी होती. न्यायालयात सदर सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या दाव्यानं संपूर्ण कर्नाटकासह देश हादरला.

1995 ते 2014 दरम्यान बलात्काराच्या पीडित मुली, महिला आणि पुरुषांचे जवळपास 100 मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी दफन केले होते, असा दावा सदर सफाई कर्मचाऱ्याने (Karnataka Mass Burial Case) केला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी इतके वर्षे गप्प होतो, असं या सफाई कर्मचाऱ्याने म्हटलं आहे. सदर व्यक्ती धर्मस्थळस्थित एका प्रसिद्ध धार्मिक संस्थेत काम करत होता. त्यानं भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम 183 अंतर्गत मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवला.

 

नेमकं प्रकरण काय? (Karnataka Mass Burial Case)

1995 ते 2014 पर्यंत धर्मस्थळ परिसरात सदर सफाई कामगार म्हणून काम करत होता. या काळात त्याला अनेक क्रूर हत्या केल्यानंतर मृतदेह दफन करण्यास भाग पाडण्यात आले. सफाई कामगाराने त्याच्या जबाबात असेही म्हटले आहे की पुरलेल्यांमध्ये 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि शारीरिक आणि मानसिक छळ झालेल्या अनेक मुली होत्या. मी नग्न अवस्थेतील अनेक महिलांचे मृतदेह पाहिले, असंही हा सफाई कर्मचारी म्हणाला. सफाई कर्मचाऱ्यानं मॅजिस्ट्रेटसमोर जबाब नोंदवताना फोटो आणि पुरावेदेखील दिले.

मला सुरक्षा पुरवा, मी सगळं सांगतो-

1998 मध्ये जेव्हा मी मृतदेह दफन करण्यास नकार दिला आणि पोलिसांना या प्रकरणाची माहिती देणार होता तेव्हा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. तक्रार करणाऱ्या सदर सफाई कर्मचाऱ्याने असंही जबाबात म्हटलं की, धर्मस्थळ गावाभोवती अनेक ठिकाणी हे मृतदेह पुरण्यात आले होते. याशिवाय काही मृतदेह जाळण्यासाठी डिझेलचा वापरही करण्यात आला होता. या सगळ्यामागे काही ‘शक्तिशाली लोक’ आहेत. जर त्याला पुरेशी सुरक्षा दिली तरच तो त्या लोकांची ओळख उघड करू शकेल, असं सदर सफाई कर्मचाऱ्याने म्हटलं आहे.

तपास करण्यासाठी एसआयटी टीम स्थापन-

सदर प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकिलांच्या एक टीमनं तपासासंदर्भात गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान कर्नाटक सरकारनं रविवारी (20 जुलै) या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक विशेष तपास पथक म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची (एसआयटी) स्थापना केली आहे. या एसआयटीचं नेतृत्व डीजीपी दर्जाचे अधिकारी प्रणब मोहंती करत आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon