टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

It’s signed… ट्रम्प यांच्या विधानानंतर जगाने टाकला सुटकेचा नि:श्वास, अमेरिका-इराण शांतता करारावर अखेर स्वाक्षरी

America Iran Deal MoU Final : अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षानंतर अखेर आता अमेरिका- इराणकडून सामंजस्य करारावर सही करण्यात आली आहे. दोन्ही देशांमधील या शांतता करारामुळे हाँ संघर्ष अखेर थांबणार असून जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

It’s signed… ट्रम्प यांच्या विधानानंतर जगाने टाकला सुटकेचा नि:श्वास, अमेरिका-इराण शांतता करारावर अखेर स्वाक्षरी

अनेक महिन्यांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर, अखेरीस अमेरिका आणि इराण यांच्यात आता एक करार झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी एका सामंजस्य करारावर (MoU) अधिकृतपणे स्वाक्षऱ्या केल्या आहेत. अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी (17 जून) या करारावर स्वाक्षरी केली आणि त्यानंतर हा करार त्वरित लागू झाला आहे. ‘It’s signed’ असं ट्रम्प यांनी आपल्या खास अंदाजात सांगितल्याचीही माहिती समोर आली आहे.

एका अमेरिकन अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्समधील वर्सेल्स (Versailles) येथे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत झालेल्या स्नेहभोजनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिका-इराण कराराच्या मूळ प्रतीवर अधिकृतपणे स्वाक्षरी केली. स्वाक्षरी केलेल्या कराराच्या प्रती इराण आणि मध्यस्थी करणाऱ्या देशांकडेही पाठवण्यात आल्याचे त्या अधिकाऱ्याने नमूद केलं. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि इराणचे मुख्य वार्ताकार मोहम्मद बागेर घलिबाफ यांनी रविवारी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, या करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे दोन्ही देशांमधील सुमारे चार महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष आता संपुष्टात आला आहे.

जिनिव्हात भेट होणार की नाही ?

दरम्यान या करारावर दोन्ही राष्ट्रांच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या असूनही अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी जिनिव्हा येथे भेट होणार आहे. स्वित्झर्लंडमधील या भेटीचा उद्देश करारावर स्वाक्षरी करणे हा नसल्याचे इराणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, ही भेट प्रत्यक्ष होणार की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय पुढील काही तासांत अपेक्षित आहे.

 

इराणच्या राष्ट्रपतींनीही केली स्वाक्षरी

दरम्यान, इराणच्या ‘इरना’ (IRNA) या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी तेहरानमध्ये इराणच्या वतीने या करारावर स्वाक्षरी केली. या संस्थेने काही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत, ज्यामध्ये ते स्वतःची आणि ट्रम्प यांची स्वाक्षरी असलेला करारनामा दाखवताना दिसले. मात्र, या कराराचा तपशील अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही. अमेरिकेकडून देण्यात आलेली माहितीच इराणच्या सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीने ही दिली.

होर्मुज उघडणार ?

सध्याच्या वृत्तानुसार, या कराराचा मुख्य भाग युद्धापूर्वीची स्थिती पुन्हा प्रस्थापित करणारा असेल. संघर्ष थांबवणे, तेहरानच्या अणुकार्यक्रमाबाबत अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी पुन्हा सुरू करणे आणि होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा खुली करणे यांचा यामध्ये समावेश आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगभरातील अनेक देशांना तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्यासाठी वापरला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे आणि तो बंद झाल्यामुळे ऊर्जेचे एक ऐतिहासिक संकट निर्माण झाले होते.

दोन्ही देशांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, या करारानुसार तेहरानला आपला अत्याधिक संवर्धित युरेनियमचा (Highly Enriched Uranium) साठा कमी करावा लागेल आणि अमेरिकेने लादलेले निर्बंध उठवले जातील. या करारामुळे इराणला आपले तेल स्वतंत्रपणे विकण्याची त्वरित परवानगी मिळेल.

हे सुद्धा वाचा

Gold Rates Today : आली रे आली, सोन्याची गुड न्यूज आली ! खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या ताजे दर

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा