टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

हॉटेलमध्ये खाताय ते ‘पनीर’च आहे का? रेस्टॉरंट, हॉटेल चालकांकडून आरोग्याशी खेळ, अन्न व औषध प्रशासनाचा मोठा दणका

Follow Us:

Cheese Analogue Or Paneer: खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ करण्यात येते. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर जी थाळी समोर येईल, अथवा जी डीश ऑर्डर कराल, त्यात ते पदार्थ भेसळीचे नसतील याची खात्री नसते. असाच एक प्रकार पनीरबाबत घडत आहे. तुम्ही अलर्ट आहात ना?

Cheese Analogue: हॉटेलमध्ये खाताय ते 'पनीर'च आहे का? रेस्टॉरंट, हॉटेल चालकांकडून आरोग्याशी खेळ, अन्न व औषध प्रशासनाचा मोठा दणका

Cheese Analogue Or Paneer: खाद्यपदार्थात सर्वात मोठी भेसळ होते. कित्येक दिवसांच्या तेलात पदार्थ तळले जातात. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जी थाळी, डिश तुम्ही मागवली, ती भेसळयुक्त पदार्थांची नाही, याची खात्री कुणालाच देता येत नाही. केवळ जिभेला चव येते हाच एक निकष ग्राहकांचा असतो, त्यामुळे हॉटेल्स चालकांचे फावते. आता पनीर डिश ऑर्डर करत असाल तर ते खरंच पनीर आहे का याची खात्री करून घ्या. कारण पनीरच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी चीज ॲनालॉग मारले जात असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात आता अन्न व औषध प्रशासनाने मोठा इशारा दिला आहे.

चीज ॲनालॉग वापराबाबत मोठा इशारा

चीज ॲनालॉग वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाचा इशारा दिला आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्समध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पनीर फक्त दुधापासून तर अॅनालॉग वेगळ्या घटकांपासून तयार होते. रेस्टॉरंट, हॉटेल्सला बिल मेनूकार्डवर “चीज/पनीर ॲनालॉग” स्पष्ट नमूद करणे बंधनकारक असल्याचे औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लेबलिंग व माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. उत्पादक आणि पुरवठादारांनीही योग्य लेबलिंग करणे आवश्यक असल्याचे बजावण्यात आले आहे. तर ग्राहकांना खरेदीवेळी “ॲनालॉग” तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संशयास्पद प्रकारांबाबत तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सरकारचे याविषयीचे परिपत्रक :

चीज/पनीर ॲनालॉग असे वेगवेगळे स्पष्ट करा

चीज ॲनालॉग वापराबाबत अन्न व औषध प्रशासनाचा इशारा दिला आहे. रेस्टॉरंट/हॉटेल्समध्ये ग्राहकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी विधीमंडळ अधिवेशनात मुद्दा मांडला होता. मंत्री नरहरी झिरवळांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाने थेट आदेश दिले आहे.

पनीर फक्त दुधापासून तयार होते. तर चीज ॲनालॉग वेगळ्या घटकांपासून तयार होतो. रेस्टॉरंट/हॉटेल्सला बिल, मेनूकार्डवर “चीज/पनीर ॲनालॉग” स्पष्ट नमूद करणे बंधनकारक आहे. लेबलिंग व माहिती न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आले आहे. उत्पादक/पुरवठादारांनीही योग्य लेबलिंग करणे आवश्यक आहे. संशयास्पद प्रकारांबाबत तक्रार करण्याचे आवाहन देण्यात आले आहे. राज्य सरकारने आता याविषयी गंभीर दखल घेतली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विलासराव देशमुखांबद्दल संजूबाबाने असं काही म्हटलं..; ऐकून रितेश देशमुखला अश्रू अनावर, जिनिलियाही भावूक

Horoscope Today 21st April 2026 : या तीन राशींचे दारिद्रय कायमचे जाणार, पैशांचा वर्षाव होणार; तुम्ही तर भाग्यवंत नाहीत ना?

Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या…

भारतीय जहाजावरील गोळीबारानंतर सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, थेट इराणच्या..

Gold Price Today : सकाळीच आली गुड न्यूज! सोन्याच्या भावात आजही घसरण, 10 ग्रॅम सोनं आता…

जगाचा विनाश करणारा डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश, थेट हाहाकार, काही क्षणात लष्करप्रमुखांना..