Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना असणार आहे.
आयपीएलच्या 18 व्या मोसमात मंगळवारी 8 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगणार आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमनेसामने असणार आहेत. अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची धुरा आहे. तर ऋषभ पंत एलएसजीचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी याआधी 2 सामने जिंकले आहेत. तर तितकेच सामने गमावले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये या मोसमात तिसरा विजय मिळवण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना केव्हा?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना मंगळवारी 8 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना कुठे?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना ईडन गार्डन्स, कोलकाता येथे आयोजित करण्यात आला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह सामना जिओहॉटस्टार एपवर पाहता येईल.
कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.
लखनौ सुपर जायंट्स टीम: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, राजवर्धन हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.
इतर महत्त्वाच्या बातम्या
चालू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! मुख्य कोचनी संघाशी संबंध तोडले, अचानक दिला राजीनामा
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता खात्यात कधी जमा होणार?