IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या हंगामाला 17 मे पासून पुन्हा सुरुवात होत आहे. प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आघाडीवर आहेत.
नवी दिल्ली : आयपीएलच्या 18 व्या हंगामाला एका आठवड्याच्या ब्रेकनंतर पुन्हा सुरुवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित करण्यात आलं होतं. दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानं तणाव कमी झाल्यानं आयपीएल पुन्हा 17 मे पासून सुरु करण्यात येणार आहे. आयपीएच्या 18 व्या हंगामाची अंतिम फेरीची लढत नव्या वेळापत्रकानुसार 3 जूनला होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे तीन संघ फ्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. आता राहिलेल्या 7 संघांमध्ये प्लेऑफची शर्यत आहे. गुणतालिकेत पहिल्या चार स्थानांवर असलेल्या संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश मिळेल.
गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, पंजाब किंग्ज हे तीन संघ आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.तर, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात चौथ्या स्थानासाठी शर्यत आहे. यापैकी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये तगडी स्पर्धा आहे.

गुजरात टायटन्स : शुभमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्सनं 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत. त्यापैकी तीन सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. तर, गुजरात टायटन्सकडे 16 गुण आहेत. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांना तीन पैकी किमान एक मॅच जिंकावी लागेल. जर टीमनं राहिलेल्या तीन पैकी दोन मॅचेसमध्ये विजय मिळवला तर ते टॉप 2 मध्ये स्थान मिळवतील.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : आरसीबी आणि केकेआर यांच्यात 17 मे रोजी मॅच होणार आहे. आरसीबीकडे केकेआरला पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ होण्याची संधी शक्यता आहे. आरसीबीनं 11 सामन्यात 16 गुण मिळवले आहेत.
पंजाब किंग्ज : श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जनं 11 पैकी 7 मॅचेस जिंकल्या आहेत. त्यांच्याकडे 15 गुण आहेत. कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द झाला आहे. तर, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील मॅच पुन्हा होणार आहे. पंजाबला राहिलेल्या तीन पैकी किमान 2 मॅचेस जिंकाव्या लागतील.
मुंबई इंडियन्स : मुंबई इंडियन्सनं 12 सामन्यात 14 गुण मिळवले आहेत. मुंबईचं नेट रन रेट (+1.156) इतकं आहे. मुंबईला पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध विजय मिळवावा लागेल. मुंबईचा एका सामन्यात जरी पराभव झाला तरी दिल्ली कॅपिटल्सला त्याचा फायदा होऊ शकतो.
संबंधित बातम्या
दिल्ली कॅपिटल्स : दिल्ली कॅपिटल्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये दणक्यात सुरुवात केली होती. मात्र, मुंबई विरुद्ध पराभव झाल्यानंतर त्यांची लय बिघडली. आता त्यांच्याकडे तीन सामने जिंकत 19 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. दिल्लीनं दोन सामने जिंकले तर मुंबईचा एका सामन्यात पराभव झाल्यास त्यांना प्लेऑफचं तिकीट मिळेल.
लखनौ सुपर जायंटस : रिषभ पंतची लखनौ सुपर जायंटस अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहे. त्यांच्याकडे 16 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. एक जरी पराभव झाला तर ते स्पर्धेबाहेर जाऊ शकतात. लखनौनं 11 सामन्यात 10 गुण मिळवले आहेत. लखनौचे पुढील सामने आरसीबी, गुजरात आणि सनरायडर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहेत.
हेदेखील वाचा
पाणी पिऊनही घसा कोरडाच राहतो? सतत तहान लागण्यामागे असू शकते हे कारण




