Ind vs Eng 2nd Test Match: भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
Ind vs Eng 2nd Test Match: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आजपासून दुसरा कसोटी सामना रंगणार आहे. दुपारी 3 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. बर्मिंगहॅम येथे भारताची कामगिरी खराब ठरली आहे. आतापर्यंत येथे खेळलेल्या सात कसोटींत भारतीयांना अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. हा दुष्काळ संपवायचा असेल तर तळाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल.
इंग्लंडनं दुसऱ्या कसोटीसाठी 15 सदस्यांचा संघ 26 जूनला जाहीर केला होता. त्यावेळी जोफ्रा आर्चरला संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र, त्याला अंतिम 11 मध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. दुसऱ्या कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, वॉशिंग्टन सुंदरला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
रिषभ पंतसाठी विशेष प्लॅनिंग
क्रिस वोक्सनं म्हटलं की हेडिंग्लेमध्ये रिषभ पंतनं चांगली खेळी केली, त्यानं दोन्ही डावात शतकं केली होती. वोक्सनं म्हटलं की मला आशा आहे की आम्ही त्याला लवकर आऊट करु शकू, आम्ही सर्वांनी एकत्र चर्चा केलेली नाही. मात्र, आम्ही काही खेळाडूंवर नक्की चर्चा करणार आहे. त्या खेळाडूंविरुद्ध चागंली कामगिरी करण्याचा प्रयत्न करु, क्रिस वोक्सनं म्हटलं. रिषभ पंतनं इंग्लंड विरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटीमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे. इंग्लंडच्या धरतीवर 1000 धावा तो लवकरच पूर्ण करेल. पंतनं आतापर्यंत इंग्लंडमध्ये 10 कसोटीत 808 धावा केल्या आहे.
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन: जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.