टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त

अन्नसुरक्षा आणि मानदे कायद्यानुसार आईस्क्रीम आणि कुल्फी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल किंवा फॅट वापरण्यास सक्त मनाई आहे.

अन्नसुरक्षा आणि मानदे कायद्यानुसार आईस्क्रीम आणि कुल्फी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल किंवा फॅट वापरण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तपासणी दरम्यान संबंधित कुल्फींमध्ये अशा घटकांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली. दरम्यान, जप्त साठ्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिकारी बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनमार्फत उत्पादीत आणि पुरवठा होणार्‍या कुल्फींमध्ये भेसळ होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, शहरातील वितरकांना माल पुरवठा करणार्‍या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यावेळी कुल्फीचा साठा आढळून आला आणि तो तात्काळ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित कंपनीला खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमभंग सिद्ध झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now