टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

रेवतीच्या लग्नाची बातमी द्यायला अजितदादांना फोन केला, पण शरद पवारांना बोलता येत नव्हतं, साहेबांची अवस्था पाहून अजितदादांच्या डोळ्यात पाणी आलं: रोहित पवार

Follow Us:

Rohit Pawar on NCP Merger: रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणात डीजीसीए आणि व्हीएसआर विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Rohit Pawar on NCP Merger: अजित पवारांच्या अंत्यविधीपूर्वीच रोहित पवारांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु केली होती, असा आरोप अजित पवार गटातील काही नेत्यांनी केला होता. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. मला विलीनीकरण नको होतं. आता दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण (NCP Merger) करुन फायदा नाही. आम्हाला विलीनीकरण करायचं नाही, असेदेखील मी म्हटले होते. पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आणणे ही अजित पवार (Ajit Pawar) यांची भावनिक इच्छा होती. यामध्ये मी राजकारण कशाला आणू, असे रोहित पवार यांनी म्हटले. ते गुरुवारी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Maharashtra Politics news)

शरद पवार साहेबांचं वय बघता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणे, ही अजितदादांची भावनिक इच्छा होती. अजित पवार यांचे वडील.. अनंत आजोबा अजितदादांच्या वयाच्या 18व्या वर्षी वारले. ते गेल्यानंतर अजितदादांना कोणी मुलासारखं वागवलं असेल तर ते शरद पवार होते. हे अजितदादांच्या मनात होतं, त्यांनी आम्हाला हे बोलून दाखवले होते. जेव्हा रेवतीचं लग्न ठरलं, हे सांगायला पवार साहेबांनी अजितदादांना फोन केला, तेव्हा मी तिथे होतो. त्यावेळी पवार साहेबांना कफ असल्यामुळे फोनवर बोलता येत नव्हते. पवार साहेब काय बोलतायत हे अजितदादांना कळत नव्हते. हे बघून अजितदादांच्या डोळ्यात पाणी आलेलं मी बघितले आहे. अजितदादांची ही भावनिक भूमिका असताना आम्ही यामध्ये राजकारण का करु? अरे नको आम्हाला विलीनीकरण, पण अजितदादांना न्याय तर द्या. एफआयआर दाखल तर करा. एफआयआरच दाखल केली नाही, तर अजितदादांना न्याय कसा मिळणार, हे माझं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Rohit Pawar and Parth Pawar: पार्थ पवार तुमच्यासोबत का नाहीत? रोहित पवारांचं उत्तर, म्हणाले…

रोहित पवार हे सध्या पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या अपघाताबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत आहेत. मात्र, तुमच्या या सगळ्या प्रयत्नांमध्ये पार्थ आणि जय पवार तुमच्यासोबत का नाहीत, असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला. त्यावर रोहित पवार यांनी म्हटले की, पार्थ त्याच्या लेव्हलवर अधिकाऱ्यांसोबत बोलून लढत असेल. तो लढत नाही असं आपल्याला बोलून चालणार नाही. जय त्याच्या लेव्हलवर तिथं बोलतोय. काकींनी सीबीआयकडे चौकशी द्यावी, अशी मागणी केलीय. त्या त्यांच्या पातळीवर लढत आहेत. सगळे त्यांच्या त्यांच्या परीनं लढत आहेत. फक्त विषय एवढाच आहे, मंदगतीनं दादांच्या अपघाताची चौकशी चालली आहे, असं रोहित पवार म्हणाले. मला वाटत नाही त्यांच्यावर दबाव आहे. ते त्यांच्या लेव्हलनं प्रयत्न करत आहेत, आम्ही आमच्या पातळीवर लढत आहोत, असे रोहित पवार यांनी म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Loksabha : लोकसभेतील खासदार 850 होणार, महिला आरक्षण लागू होणार; मोदी सरकारचा मोठा प्लॅन समोर

मोठी बातमी! युद्धविराम होताच चीनचा भारताला मोठा धक्का, पुन्हा पाठीत खंजीत खुपसला, संतापजनक कृत्य

उन्हाळ्यात जपून, कुल्फीमध्ये चक्क वनस्पती तेल अन् भेसळ; अन्न व औषध विभागाची धाड, 1856 पॅकेट्स जप्त

Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! नारळ, कापड, बाहुली अन् टाचण्या… हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस

क्षणात धमाका होऊन जहाजाचे तुकडे…होर्मुझमध्ये इराणने कोणत्या माईन्स पेरल्या; वाचून चकितच व्हाल!

BJP News : 28 वर्ष पक्ष कार्यालयात शिपायाचं काम केलं, त्या व्यक्तीला भाजपने दिलं निवडणुकीच तिकीट