Sambhajinagar Nagpur Expressway : नागपूरकडून संभाजीनगर कडे जाणाऱ्या भरधाव ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक समोरून येणाऱ्या सिंध कंपनीच्या ट्रव्हल्सवर जाऊन धडकून भीषण अपघात झाला.
वाशिम जिल्ह्यातील पेडगाव येथे अपघात
वाशिम जिल्ह्यातील पेडगाव येथे झालेल्या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाची ओळखपत्र पटली असून मुकेश विठ्ठल नाटे (वय 36) राहणार अकोट जिल्हा अकोला असे जाग्यावरच मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. तर या अपघातात गंभीर जखमी झालेले ट्रॅव्हल्स चालक अशोक वानखडे (वय 55) राहणार अकोट यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
-
2/7
सिंध कंपनीची ट्रॅव्हल्सला अपघात
पुण्याहून कारंजा जाणारी सिंध कंपनीची ट्रॅव्हल्स क्रमांक MH 37W 7772 तर नागपुर कडून संभाजी नगर कडे जाणारा ट्रॅक क्रमांक CG 04 MH 0391 यांचा पेडगाव गावा जवळ भीषण अपघात झाला या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स मधील 6 प्रवासी गंभीर जखमी झाले तर 15 प्रवासी किरकोळ जखमी झालेत.
-
3/7
ट्रकचा टायर फुटला
नागपूरकडून संभाजीनगर कडे जाणाऱ्या भरधाव ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक समोरून येणाऱ्या सिंध कंपनीच्या ट्रॅव्हल्सवर जाऊन धडकून भीषण अपघात झाला.
-
4/7
केबिनचा अक्षरशः चुराडा
हा अपघात इतका भीषण होता की, ट्रॅव्हल्सच्या केबिनचा अक्षरशः चुराडा झाला तर ट्रक जाग्यावरच पलटी झाला.
-
-
5/7
ट्रॅव्हल्सचा चालकाचा मृत्यू
या अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक अशोक वानखडे केबिनमध्ये फसून मृत्यू झाला. अपघातात एका प्रवासाचा मृत्यू झाला असून अजून त्याची ओळख पटली नाही. तर जवळपास वीस हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
-
6/7
रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच कारंजा, शेलूबाजार, मंगरूळपीर येथील सर्व 108 रुग्णवाहिकेसह जय गुरुदेव समृद्धी रुग्णवाहिका, शिवनेरी रुग्णवाहिका दादाजी रुग्णवाहिका, वेदांत रुग्णवाहिका, जय गजानन रुग्णवाहिका, जगद्गुरु नरेंद्राचार्य रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
-
7/7
वाहतूक विस्कळीत
ट्रक महामार्गावर पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत होऊन महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला केली असून आता वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.