Heart Attack: ‘हा’ ब्लड ग्रुप असणाऱ्यांना हार्ट अटॅकचा सर्वात जास्त धोका, तुमचा रक्तगट किती सुरक्षित? वाचा…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

तुमचा रक्तगट कोणता आहे यावरून तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात किंवा तुम्हाला कोणत्या आजाराचा धोका आहे हे समजू शकते. रक्तगटाच्या आधारे शास्त्रज्ञांनी हार्ट अटॅकचा धोका किती आहे यावर भाष्य केले आहे. ए

तुमचा रक्तगट कोणता आहे यावरून तुम्हाला कोणते आजार होऊ शकतात किंवा तुम्हाला कोणत्या आजाराचा धोका आहे हे समजू शकते. रक्तगटाच्या आधारे शास्त्रज्ञांनी हार्ट अटॅकचा धोका किती आहे यावर भाष्य केले आहे. एका अभ्यासानुसार O रक्तगट असलेल्या लोकांनी हृदयविकाराचा धोका कमी असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जगात जवळपास 42 टक्के लोकांचा रक्तगट हा O आहे. या लोकांना हार्ट अटॅकचा धोका इतरांच्या तुलनेत कमी आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या अभ्यासानुसार O रक्तगट असलेल्यांनाही हृदयविकाराचा धोका कमी आहे. मात्र A, B आणि AB रक्तगट असलेल्या लोकांना जास्त धोका असतो. हाय कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि तणाव असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो असं बोललं जात होतं, मात्र आता नवीन अभ्यासानुसार रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल सारख्या घटकांव्यतिरिक्त रक्तगटही हृदयविकाराच्या जोखमीवर परिणाम करतो.

O रक्तगट असलेल्यांना धोका कमी का असतो?

TOI अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस जर्नलमध्ये एक अहवाल प्रकाशित झाला आहे. यातील माहितीनुसार रक्तगट A, B किंवा AB असलेल्या लोकांना O रक्तगट असलेल्यांपेक्षा हृदयविकाराचा धोका जास्त आहे. हा धोका 6% ते 23 % जास्त आहे. तर O रक्तगट असलेल्यांना हा धोका कमी आहे. याचे कारण म्हणजे O रक्तगटामध्ये रक्त गोठवणारे घटक व्हॉन विलेब्रँड फॅक्टर आणि फॅक्टर VIII कमी प्रमाणात असतात. तसेच या रक्तगटाक कोलेस्टेरॉलची पातळीही कमी असते. त्यामुळे या लोकांना धोका कमी असतो.

रक्तगटाता स्ट्रोकच्या धोक्याचाही परिणाम

या अभ्यासात असेही समोर आले आहे की, रक्तगट हा स्ट्रोकच्या धोक्यावरही परिणाम करतो. A रक्तगट असलेल्यांना 60 वर्षांआधी स्ट्रोकचा धोका जास्त असतो, तर O रक्तगट असलेल्यांना धोका कमी असतो. थ्रोम्बोसिस अँड हेमोस्टेसिस जर्नलमधील एका अहवालानुसार मधुमेह नसलेल्या लोकांमध्ये AB रक्तगट असलेल्यांना O रक्तगट असलेल्या लोकांपेक्षा स्ट्रोकचा धोका 1.6 ते 7 पट जास्त होता.

रक्तगट का महत्त्वाचा असतो?

रक्तगट कोणता आहे हे तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. रक्तातील अँटीजेन्स रक्त गोठण्यावर परिणाम करतात. वेगवेगळ्या रक्तगटांमध्ये वेगवेगळे अँटीजेन्स असतात. O रक्तगट नसलेल्या लोकांमध्ये फॅक्टर VIII आणि व्हॉन विलेब्रँड फॅक्टरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वेगाने रक्त गोठते. तसेच यामुळे रक्त प्रवाह मंदावतो. त्यामुळे रक्तगट महत्त्वाचा आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon