नाझरा (वार्ताहर): नाझरे जिल्हा परिषद गटाच्या वतीने बलवडी ता. सांगोला गावचे उपसरपंच रविराज रमेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महा आरोग्य शिबिर, भव्य रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे, मोतीबिंदू ऑपरेशन इत्यादी शिबिराचे जि. प. प्रा. शाळा बलवडी येथे नियोजन करण्यात आले होते.
सदर शिबिर सकाळी 10 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत आयोजित केले होते. यामध्ये दक्षता हॉस्पिटल हृदयरोग तपासणी, नंदादीप नेत्रालयामार्फत डोळे तपासणी, चष्मे वाटप, तर सोमेश यावलकर रेवनील ब्लड बँकेतर्फे रक्तदान शिबिर यामध्ये 187 रक्तदात्याचे रक्तदान झाले असल्याचे सोमेश यावलकर यांनी सांगितले.
सदर शिबिरास शिवसेना नेते सागर दादा पाटील, युवा नेते प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, माजी सरपंच बाळासो शिंदे, प्रसाद शिंदे, डॉ.शिवाजीराव ढोबळे, सरपंच माऊली राऊत, सोसायटी चेअरमन शिवाजी शिंदे, साहेबराव शिंदे, समाधान शिंदे, सर्जेराव मोहिते, चांगदेव तात्या शिंदे, ग्राम. सदस्य शिवाजी शिंदे, बाबासोपाल सांडे, कृष्णदेव कारंडे, विकास पवार, सुरेश गुरव, संजय करडे, भोपाल धायगुडे, डॉक्टर धायगुडे, महादेव शिंदे, रमेश शिंदे, बाळासो खुळपे, उल्हास मिसाळ, दत्तात्रय खुळे, सूर्यकांत खुळे, सरपंच भीमराव खांडेकर, चेअरमन औदुंबर खांडेकर, पत्रकार रविराज शेटे, विकास जावीर, शिक्षक मनोहर पवार, सूर्यकांत शिंदे, तात्यासो शिंदे, विजय शिंदे, युवा नेते परमेश्वर धुरे, शिवसेना युवा तालुकाप्रमुख अजिंक्य शिंदे, आदित्य शेगावकर, ग्रामस्थ, महिला, युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.