सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला रोटरी क्लब माजी अध्यक्ष व समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक श्री शिवाजीराव पवार यांच्या धर्मपत्नी कै रंजना पवार यांच्या चतुर्थ श्राद्ध दिनाचे निमित्ताने अन्नदान करण्यात आले.
दि.29 जुलै 2025 रोजी मातोश्री वृद्धाश्रम सांगोला येथे दाखल झालेल्या वृद्ध बंधू भगिनींना 29 जुलै रोजी चहापाणी व दोन्ही वेळचे यांच्या पसंतीनुसार जेवण देण्यासाठी रोख रक्कम वृद्धाश्रम चालवणारे श्री राहुल जाधव सर यांच्याकडे शिवाजीराव पवार यांनी दिले.
यावेळी श्री.शिवाजीराव पवार यांनी सांगितले की, यापुढेही माझ्याकडून मातोश्री वृद्धाश्रम सांगोला या ठिकाणी हा उपक्रम प्रत्येक वर्षी साजरा केला जाईल. माझ्यानंतरही माझी मुले हा उपक्रम राबवतील, अशी हमीही बोलताना व्यक्त केली.
श्री राहुल जाधव सर म्हणाले की, वृद्धाश्रम चालवण्यासाठी सरकारकडून कसलीच सवलत मिळत नसल्याचे सांगितले व श्री.पवार यांच्यासारखे आणखी दाते भेटले तर आम्हास निराधार आजी आजोबांना मदत होईल, अशी भावना व्यक्त करून मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व सभासदांचे वतीने श्री.पवार यांचे आभार मानले.