सांगोला – मोहन हॉस्पिटलमध्ये हृदयविकारांसाठी अत्याधुनिक आणि सर्वसमावेशक उपचार सेवा सुरू झाल्या आहेत. आता सांगोल्याचे सुपुत्र, सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ. प्रदीप देवकते रुग्ण तपासणीसाठी तसेच अंजिओग्राफी व अंजिओप्लास्टी सारख्या अत्यावश्यक हृदयशस्त्रक्रियांसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती डॉ.मकरंद येलपले यांनी दिली.
डॉ. देवकते हे अत्यंत अनुभवी व विश्वासार्ह कार्डिओलॉजिस्ट असून त्यांनी आजवर हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत.ते गुंतागुंतीच्या व जास्त अडचण निर्माण करणार्या हृदयातील ब्लॉकेजेस (अवघड हृदयविकार) अगदी कुशलतेने व यशस्वीपणे उपचार करतात.त्यांच्या कौशल्याचा फायदा आता सांगोला आणि परिसरातील रुग्णांना स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहे. त्यामुळे रुग्णांना पुणे, सांगली किंवा सोलापूरसारख्या मोठ्या शहरांत जाण्याची गरज उरणार नाही.
नवीन स्थापित अत्याधुनिक कॅथलॅब ही सांगोला परिसरातील सर्वात प्रगत सुविधा असून येथे हृदयशस्त्रक्रिया सुरक्षित, वेगवान आणि अचूक पद्धतीने केल्या जातात.
मोहन हॉस्पीटलमध्ये हृदयविकारांची सखोल तपासणी व सल्ला, ईसीजी, 2 डी कोकार्डिओग्राफी, कॅथलॅबमध्ये अंजिओग्राफी व अंजिओप्लास्टी, जड व गुंतागुंतीच्या हृदयविकारांवर उपचार व शस्त्रक्रिया व हृदयविकार प्रतिबंधासाठी उपाययोजना व वैयक्तिक उपचार नियोजन आदी सुविधा उपलब्ध आहेत.
रुग्णसंख्येच्या आधारे फक्त पूर्वनोंदणीकृत रुग्णांनाच प्राधान्य देणार असून डॉ.प्रदीप देवकते हे प्रत्येक रविवार-सकाळपासून तपासणीस सुरुवात (पूर्ण आठवडा टेली कन्सलटेशन उपलब्ध) असणार आहेत. अधिक माहितीसाठी मोहन हॉस्पिटल,मिरज रोड, रेल्वे पुलाजवळ, सांगोला(मो. 86980 39494) या दूरध्वनीवर संपर्क साधावा.