टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Eknath Shinde Shivsena: ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंना भेटल्याची आवई उठताच खासदारांच्या धडाधड प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाले…

Follow Us:

Eknath Shinde Shivsena: ठाण्यातील या कथित गुप्त बैठकीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. तर ठाकरेंच्या खासदारांनी या बैठकीबाबतच्या चर्चा नाकारल्या आहेत.

Eknath Shinde Shivsena: राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. दिल्लीतील नेतृत्वाकडून ठाकरे गटातील खासदार फोडण्यासाठी अधिकृत परवानगी मिळाली नसल्याचे बोलले जात असले, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पडद्यामागे हालचाली करत असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, शिंदे अजूनही ठाकरे गटाच्या काही खासदारांशी गुप्तपणे संपर्क साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटातील काही खासदारांची गोपनीय बैठक झाल्याची चर्चा रंगली आहे. या बैठकीमुळे शिवसेना (ठाकरे गट)मध्ये अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात ‘ऑपरेशन टायगर’द्वारे मोठी राजकीय घडामोड घडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी सर्व खासदारांनी पक्षाशी निष्ठा राखण्याची ग्वाही दिली होती. मात्र, ठाण्यातील या कथित गुप्त बैठकीनंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे. तर ठाकरेंच्या खासदारांनी या बैठकीबाबतच्या चर्चा नाकारल्या आहेत, तसेच आपला याच्याशी काहीही संबंध नाही असं सांगितलं आहे.

UBT MP : मी दोन दिवसांपासून पुण्यात आहे कुठल्याही बैठकीचा काही संबंध नाही – खासदार संजय जाधव 

शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी एकनाथ शिंदे यांंच्या बैठकीबाबतच्या प्रश्नावर फोनवरून एबीपी माझाला माहिती दिली. ते म्हणाले की, मी दोन दिवस झालं पुण्यामध्ये आहे. त्यामुळे त्या बैठकीचा आणि माझा काहीही संबंध नाही. मी कुठल्याही बैठकीला गेलो नाही, ना कुणाशी माझा संपर्क झालेला आहे. माझं काम चालू आहे आणि पक्षांतराचा सध्या तरी कुठलाही विषय नाही अशी प्रतिक्रिया परभणीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी एबीपी माझाशी फोनवरून बोलताना दिली आहे

UBT MP : एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची कोणतीही बैठक झाली नाही – खासदार नागेश पाटील आष्टीकर 

एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या आठ खासदारांची ठाण्यामध्ये एक गुप्त बैठक घेतल्याच्या  माहिती समोर येत आहे यामध्ये हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होते अशी सूत्रांची माहिती आहे. या संदर्भात नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी फोनवर दिलेल्या माहितीनुसार अशा कोणत्याही बैठकीला मी हजर नव्हतो. या बातम्यांना काही अर्थ नाही किंवा अशी कोणती बैठक झाली आहे या संदर्भात मला माहिती सुद्धा नाही, अशी प्रतिक्रिया हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली आहे.

UBT MP : मी प्रत्यक्ष वा ऑनलाइन बैठकीत उपस्थित नव्हतो – खासदार संजय देशमुख

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी झालेल्या कथित बैठकी प्रकरणी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाचे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी स्पस्ट नकार दिला आहे. मी प्रत्यक्ष वा ऑनलाइन बैठकीत उपस्थित नव्हतो. या बैठकीचे मला ना निमंत्रण होते ना मला कोणी बोलावले होते. त्यामुळे या बैठकीला जाण्याचा प्रश्नच नाही आणि मी गेलोही नाही. अशी स्पष्ट भूमिका ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख दूरध्वनीवरून बोलताना सांगितली.

अशी काही बैठक वैगरे झाली नाही, आमचे नेते अरविंद सावंत पत्रकार परिषद घेऊन त्यावर उत्तर देत आहेत, नंतर बघू असे संजय दिना पाटील यांनी फोन वर सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Operation Tiger: विकली जाणारी औलाद… ‘ऑपरेशन टायगर’ चे सावट, अरविंद सावंत यांची सर्वात जळजळीत प्रतिक्रिया

एकनाथ शिंदेंचा आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव, ठाकरेंचे 8 खासदार फोडणार, नावही ठरली, मध्यरात्रीची मोठी घडामोड

Congress Baramati Election: अखेर काँग्रेसची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, आज दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज परत घेणार, वड्डेटीवारांची माहिती

NCP Merger: मोठी बातमी! राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचं घोडं दामटणार? बारामती पोटनिवडणुकीदरम्यानची मोठी अपडेट काय?

बारामती पोटनिवडणुकीत टि्वस्ट, रोहित पवार अचानक काँग्रेसच्या मोठ्या नेत्याच्या भेटीला, पडद्यामागचा खरा गेम काय?

Sharad Pawar: कर्तृत्वान लोकप्रतिनिधी गेला… शरद पवारांचा तो सर्वात मोठा सल्ला, काँग्रेस मनावर घेणार?