नारळपाचे पाणी पिणे हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. मात्र कधीकधी हेच नारळपाणी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

आजारी असल्यानंतर नारळाचं पाणी आवर्जुन पिलं जातं. नारळात असलेलं पाणी फार पौष्टीक असल्याचेही सांगितले जाते. मात्र हेच नारळाचे पाणी तुम्हाच्या शरीरालाही हानी पोहोचवू शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नारळाचे पाणी काही लोकांच्या शरीरासाठी हानीकारक ठरू शकते. नाराळच्या पाण्यात असलेला पोटॅशियम हा घटक पीबीच्या गोळ्यांसोबत मिसळून तुमच्या शरीराला इजा पोहोचवू शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नाराळाचे पाणी पिल्याने काही लोकांना अॅलर्जी होऊ शकते. नारळाचे पाणी पिल्यास त्वचेला खाज येऊ शकते, त्वचा लाल होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नारळ पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मुत्रपिंडाची समस्या असणाऱ्या लोकांनी नारळपाणी पिणे टाळायला हवे.(सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

नारळपाळी हे कधी कधी सर्दी-खोकल्याचेही कारण ठरू शकते. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊनच नारळपाणी प्यायला हवे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा) (सांकेतिक फोटो- फोटो सौजन्य- मेटा एआय)