टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ताशी 70 किमी वेगाने चक्रीवादळ, 17 राज्यात मोठा धोका, IMD च्या नागरिकांना सूचना, थेट..

On: June 4, 2026 11:17 AM
Follow Us:

मॉन्सून आज केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यापूर्वीच बंगालच्या खाडीत मोठे वादळ आलंय. भारतीय हवामान विभागाने तब्बल 17 राज्यांमध्ये मोठा अलर्ट जारी केला.

ताशी 70 किमी वेगाने चक्रीवादळ, 17 राज्यात मोठा धोका, IMD च्या नागरिकांना सूचना, थेट..

देशभरातील लोक मॉन्सूनची वाट पाहत आहेत. यादरम्यानच बंगालच्या खाडीत वादळाला सुरूवात झाली. अनेक राज्यांमध्ये ढगाळ वातावरण असून भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. जोरदार वारेही सुटले आहे.  आयएमडीच्या मते, येत्या काही तासांत अनेक भागात हवामान अचानक बदलू शकते. धुळीच्या वादळ्यांसह विजांचा कडकडाट आणि पाऊस होऊ शकतो. काही राज्यात गारपिटीचाही मोठा इशारा देण्यात आला. ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामानशास्त्रज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तयार होणाऱ्या प्रणालींचा परिणाम देशातील हवामानावर होऊ शकतो. भारतातील जवळपास सर्वच राज्यात वातावरणात मोठा बदल जाणवेल. नैऋत्य मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे.

भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा 

केरळमध्ये आज मॉन्सून दाखल होईल. केरळमध्ये मॉन्सूनकरिता अनुकूल वातावरण आहे. त्यानंतर पुढे पुढे मॉन्सून सरकेल. भारतीय हवामान विभागाच्या मते, येत्या काही तासांत मान्सून केरळमध्ये येईल. त्यानंतर दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. तसा अंदाज आहे. अनेक राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

17 राज्यांवर थेट संकट पुढील काही तास धोक्याची

तब्बल 17 राज्यांवर संकट आहे. अतिमुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे यादरम्यान असेल. मुसळधार पावसादरम्यान नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले. सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, पुदुचेरी, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, आसाम, मेघालय यासोबतच अंदमान निकोबार बेटांवरही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच बंगाल खाडीत वादळ 

आठवड्याभरात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. काही राज्यांमध्ये आताच वातावरण बदलल्याचे बघायला मिळतंय. मॉन्सून देशात दाखल होण्यापूर्वीच हवामान विभागाकडून मोठा इशारा देण्यात आला. देशातील अनेक राज्यात पाऊस धमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामध्येच आज पुन्हा एकदा इशारा देण्यात आला. नागरिकांना यादरम्यान अलर्ट राहण्याच्या सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now