टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Congress on Parth Pawar: वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूंनतरही… काँग्रेसची पार्थ पवारांवर विखारी टीका, आजोबांनी कान टोचल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा हल्लाबोल

Congress Hit Back on Parth Pawar: अजितदादांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर बारामतीची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसनेही उमेदवार उभा केला आहे. त्यावरून पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. त्याला काँग्रेसने विखारी उत्तर दिले आहे. आजोबा शरद पवार यांनी कान टोचल्यानंतर आता राष्ट्रीय पक्षानेही पार्थ पवारांवर जहरी टीका केली आहे.

Congress on Parth Pawar: वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूंनतरही... काँग्रेसची पार्थ पवारांवर विखारी टीका, आजोबांनी कान टोचल्यानंतर राष्ट्रीय पक्षाचा हल्लाबोल

Congress Hit Back on Parth Pawar: अजितदादांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या या अपघाताविषयी सातत्याने संशय व्यक्त होत आहे. आमदार पार्थ पवार यांनी हा मुद्दा लावून धरला आहे. तर बारामती पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार उभा केला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत होती. काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने पार्थ पवार यांनी हा काँग्रेसचा डाऊनफॉल असल्याचा दावा केला होता. त्यावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. काँग्रेसने पार्थ पवारांवर विखारी टीका केली आहे.

महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या…

काँग्रेस पक्षाने पार्थ पवार यांच्या कालच्या टीकेला सणसणीत उत्तर दिले आहे. काँग्रेस पक्षाने आज ट्वीट केले आहे. त्यात ट्वीटमध्ये विखारी टीका केली आहे.”धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वत:च्या वडीलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील” असा टोला काँग्रेसने पार्थ पवार यांना लगावला आहे.

 

कर्नाटकमध्ये FIR झाला

“या मुलाच्या वडीलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला. तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे. कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?” अशी जहरी टीका काँग्रेसने केली आहे. त्यामुळे बारामती पोट निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीतील एका फळीवर काँग्रेसने सडकून टीका केल्याचे म्हटले जात आहे.

कुणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल

पार्थ पवार काय बोलताय यावर लक्ष देण्यापेक्षा निवडणुकीची एक प्रक्रिया आहे. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना फोन केला आहे. दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार हे आमच्या पेक्षा वयाने लहान आहेत. त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचे काही कारण नाही. कुणाचा डाऊनफॉल होईल हे ते वेळ सांगेल. त्यांच्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा