7 जणांचा आरामदायी प्रवास, 26 Km मायलेज; ‘या’ CNG व्हेरिएंटपुढे भल्याभल्या कारही फिक्या

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Auto News : कुटुंब लहान असो किंवा मोठं… ही एकच कार पुरेशी… सीट तर इतक्या आरामदायी की, दूरच्या प्रवासात आका कोणी नाकं मुरडणारच नाही…

Auto News : मागील काही वर्षांमध्ये भारतात कार खरेदीचं प्रमाण वाढलं असून, मध्यम ते उच्च उत्पन्न गटातील अनेकांनीच विविध धाटणीच्या आणि कंपन्यांच्या कार व्हेरिएंटना पसंती दिल्याचं पाहायला मिळालं. इंधनाचे सातत्यानं वाढणारे दर पाहता पेट्रोलच्या तुलनेत अनेकांनीच सीएनजी (CNG Car)लासुद्धा पसंती दिली आणि या श्रेणी सर्वाधिक कारची विक्री करणारी कंपनी म्हणून पुन्हा एकदा मारुती सुझुकीनं बाजी मारली.

कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 17 कार मॉडेलचा समावेश असून, यामध्ये 12 व्हेरिएंटमध्ये सीएनजी पर्यायही उपलब्ध आहेत. इतकंच नव्हे, तर मारुती हॅचबॅकपासून एसयुव्ही, एमपीव्ही कारमध्येसुद्धा सीएनजीचे पर्याय उपलब्ध आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीनं एकूण 591,730 सीएनजी कारची विक्री केली. यामध्ये 2 मॉडेल असे होते ज्यांचे प्रत्येकी 1 लाखांहून अधिक युनिट विकले गेले आणि आघाडीवर असणारं युनिट होतं अर्टिगा.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon