Chhaava Box Office Collection Day 23: विक्की कौशलच्या ‘छावा’ चित्रपटानं खळबळ उडवून दिली आहे. सध्या चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुवांधार कमाई करत आहे.
1/10

या चित्रपटानं भल्याभल्या दिग्गजांच्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. एवढंच नाहीतर आता ‘छावा’नं 500 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एन्ट्री घेतली आहे.
2/10

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चौथ्या शनिवारी छावानं जबरदस्त कलेक्शन केलं. या चित्रपटानं रिलीजच्या 23 व्या दिवशी 16.5 कोटी रुपये कमावले आहेत.
3/10

दरम्यान, चौथ्या शनिवारी झालेल्या संकलनाचे आकडे अद्याप अधिकृत नाहीत. पण जर चित्रपटानं 23 व्या दिवशी 16.5 कोटी रुपये कमावले आहेत, तर चित्रपटाचं एकूण कलेक्शन 508.8 कोटी रुपये होईल.
4/10

यासोबतच हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्येही सामील झाला आहे. या चित्रपटानं 23 व्या दिवशी कमाई करून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
5/10

या चित्रपटात दिव्या दत्ता, आशुतोष राणा यांच्यासारखे स्टार्सही दिसलेत.
6/10

फिल्मच्या शानदार ओपनिंगनंतर संपूर्ण आठवडाभरात फिल्मनं जबरदस्त कलेक्शन केलं. फिल्मनं पहिल्या आठवड्यात एकूण 219.23 कोटींचं कलेक्शन केलं होतं.
7/10

अशातच दुसऱ्या आठवड्यात फिल्मनं 180.25 कोटींची कमाई केली आहे. तिसऱ्या आठवड्यात फिल्मनं 84.5 कोटींचं कलेक्शन केलं आहे. तर, 22व्या दिवशी छावानं 8.75 कोटींचा बिझनेस केला होता.
8/10

‘छावा’बाबत बोलायचं झालं तर, या चित्रपटात विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहे. त्यानं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
9/10

या चित्रपटात रश्मिका मंदानानं महाराणी येसूबाईंची भूमिका निभावली आहे. तर चित्रपटात अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारली आहे.
10/10