Champions Trophy 2025 IND vs PAK : आज दुबईत महामुकाबला; दोन्ही संघाची रणनीती भारत अन् पाकिस्तानची संभाव्य Playing XI

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Champions Trophy 2025 IND vs PAK Playing XI: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची स्पर्धा (Champions Trophy 2025) 19 फेब्रुवारीपासून सुरु झाली असून 9 मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील हायव्होलटेज सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तानचा (India vs Pakistan Playing XI) सामना आज (23 फ्रेब्रुवारी) रंगणार आहे. आजच्या सामन्यासाठी भारताची आणि पाकिस्तानची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, जाणून घ्या…

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतला ताप आला आहे. या कारणास्तव त्याने सराव सत्रात सहभाग घेतला नाही. ऋषभ पंतला बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे यष्टीरक्षक म्हणून केएल राहुलला पुन्हा संधी मिळणार हे निश्चित आहे. बांगलादेशविरुद्ध राहुलने 41 धावांची महत्त्वाची खेळी खेळली होती.

टीम इंडियाची स्फोटक फलंदाजी –

भारताकडून कर्णधार रोहित शर्मासोबत शुभमन गिल सलामीला येतील. पहिल्या सामन्यात शुभमन गिलने शतक झळकावले होते. शुभमन गिलने बांगलादेशविरुद्ध नाबाद 101 धावा केल्या. श्रेयस अय्यर आणि विराट कोहली हे देखील भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिक पंड्याचे स्थान जवळजवळ निश्चित आहे.

पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होऊ शकतो –

पहिल्या सामन्यात पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. आता संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून मैदानात उतरू शकतो. शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांचे संघात स्थान जवळजवळ निश्चित आहे. मोहम्मद रिझवान संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

भारत आणि पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.

पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सलमान आघा, तैयब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon