Breaking News LIVE Updates: ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांच्या माध्यमांतून प्रयत्न: सूत्र

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Maharashtra Breaking News LIVE Updates: देशभरासह राज्यभरात घडणाऱ्या राजकीय तसेच विविध क्षेत्रातील ताज्या घडामोडी आणि लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात पावसाने ब्रेक घेतला असला तरी काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत. तसंच, एकीकडे राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू असतानाच राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE Updates: हगवणेंच्या अडचणीत वाढ होणार

बनावट कागदपत्र देऊन शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या अडचणीत वाढ झालीये.. उद्या पुणे पोलीस या दोघांचा ताबा घेणारा आहेत.. दोघांना पुणे पोलीस अटक करणार असून मंगळवारी या दोघांना पुणे कोर्टात हजर केलं जाणार आहे. शशांकवर वारजे तर सुशील याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे करण्यात आलाय.

8 Jun 2025, 11:58 वाजता

 Maharashtra Breaking News LIVE Updates: नाशिक शहरातही कोयता गँगची दहशत. पंचवटीत 10-15 जणांच्या टोळक्याचा धुडगूस. टोळक्याकडून पंचवटीत अनेक घरांवर हल्ला.

 

8 Jun 2025, 11:15 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांच्या माध्यमांतून प्रयत्न: सूत्र

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा जोर धरत असताना आता याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर येतीये. ठाकरे बंधूंच्या मनोमिलनासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. युतीबाबत अद्याप उद्धव आणि राज यांच्यात थेट चर्चा झालेली नाहीये. मात्र नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. मनपा निवडणुकीपूर्वी दोन्ही भावांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये..

8 Jun 2025, 11:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates:  सभेत बोलताना भान ठेवून बोलावं; निलेश राणेंचा मंत्री नितेश राणे यांना वडिलकीचा सल्ला 

नितेश ने जपून बोलावे. मी भेटल्यावर बोलेननच पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे. सभेत बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कोणाचा फायदा करतोय याचं भान असलं पाहिजे. आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही

8 Jun 2025, 10:09 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: गॅस टँकर आणि मिनीबसचा अपघात, मुंबई- गोवा महामार्ग ठप्प

lpg गॅस टँकर आणि मिनीबस यांच्यात झालेल्या भीषण अपघातानंतर मोठ्याप्रमाणात गॅस गळती झाली आहे. त्यामुळं बावनदी जवळील घरांना आग लागली असून दोन गाड्या आणि गोठा जळून खाक झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.

8 Jun 2025, 10:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान याच्या घरी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनं सरप्राईज व्हिजिट दिली.. आमिर त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ चित्रपट घेऊन येतोय. या चित्रपटाच्या निमित्तानं त्याने घरीच एका छोट्या पार्टीचं आयोजन केलं होतं. यामध्ये त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही आमंत्रित केलं होतं. सचिनला पाहून सिनेमातील सर्व दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पाहायला मिळाला. या पार्टीला सचिन सोबत राज ठाकरे आणि रणबीर कपूरही सहभागी झाले होते.. मात्र सचिनला पाहून या मुलांना सुखद धक्काच बसला आणि सगळ्यांनी एका सुरात ‘सचिनss सचिनss’ चा जल्लोष केला..

8 Jun 2025, 10:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी याला तब्बल पाच महिन्यानंतर अटक करण्यात आलीये. फरार असलेल्या अविनाश धोडी याला दादरा नगर हवेलीतून अटक केलीये. पालघर स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीये..

8 Jun 2025, 09:33 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: मिठी नदी गाळ कंत्राटातील 65 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं डिनो मोरियासह आठ जणांना समन्स बजावले. डिनोला पुढच्या आठवड्यात चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी ईडीने 13 आरोपीसह डिनो मोरियाच्या घरासह इतर 15 हून अधिक ठिकाणी शोधमोहीम राबवली होती. त्यात मुंबई व कोची येथील ठिकाणांचा समावेश आहे.

8 Jun 2025, 09:33 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्यातील भोरमध्ये बनेश्वर मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन केलं. यावेळी  बनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची विधिवत पूजा ही करण्यात आली.  या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर झालाय.

8 Jun 2025, 08:37 वाजता

VIDEO : ‘मला पण इथेच राहायचंय’; बंगळुरुतील चेंगराचेंगरीत गमावलेल्या मुलाच्या कबरीवर वडिलांचा आक्रोश

बुधवारी बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या भौमिकने आपला जीव गमावला आहे.

Maharashtra Breaking News LIVE Updates: भारतात आता उरले 5.3 टक्केच गरीब. जागतिक बँकेच्या अहवलात दिलासादायक माहिती

8 Jun 2025, 08:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार

यंदा लवकर दाखल झालेल्या मान्सूनने गेल्या काही दिवसांपासून धरणक्षेत्रात दडी मारली असून, उकाड्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणीसाठा घटला आहे… या धरणांमध्ये 11 टक्के पाणीसाठा असून, तो दहा टक्क्यांखाली घसरल्यास राखीव पाणीसाठ्याला हात घालण्याच्या हालचाली मुंबई महानगरपालिकेने सुरू केल्या आहेत… यासंदर्भात येत्या आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे.

8 Jun 2025, 08:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा निर्णय, जर्मनीतील उद्योगांना रेड कार्पेट

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मोठा निर्णय घेतलाय. जर्मनीतले जे उद्योजक महाराष्ट्रात उद्योग करण्यास इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी MIDCमध्ये 500 एकर भूखंड राखीव ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर अनिवासी महाराष्ट्रीयन नागरिकांसाठीही धोरणाअतंर्गत 100 एकर भूखंड राखीव ठेवण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.जर्मनी येथे पार पडलेल्या “महाराष्ट्र बिजनेस डे” या कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केली..

8 Jun 2025, 07:28 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: नाशिकच्या येवल्यातील गवंडगावात वादळी वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी  2 घरांचे छत आणि भिंत कोसळल्याने  3 जण जखमी झालेत.  तसंच घरांचं आणि  गोठ्यांचं ही  मोठं नुकसान झालंय. त्यामुळे  तहसीलदारांनी नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना  अधिका-यांना दिल्या आहेत.

8 Jun 2025, 07:27 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

राज्यात कोरोनाचे 86 नवे रुग्ण. राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 1 हजार 362वर मुंबईत सर्वाधिक 640 कोरोना रुग्ण

 

8 Jun 2025, 07:27 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात

पुणे सातारा महामार्गावरील केळवडे येथे, कंटेनरची डंपरला मागून धडक बसल्यान डंपरचा मागील टायर फुटून डंपर पलटी झाल्याची घटना. पुण्याच्या दिशेने जात असताना भरधाव मालवाहू कंटेनरने, क्रश सॅंडने भरलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने डंपर झाला पलटी

8 Jun 2025, 07:26 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: दिल्ली विमानतळावरून 114 उड्डाणे रद्द

दिल्ली विमानतळावरून 114 उड्डाणे रद्द. धावपट्टीच्या नुतनीकरण कामासाठी धावपट्टी बंद. 15 जूनपासून 3 महिन्यांसाठी 114 उड्डाणे रद्द.

8 Jun 2025, 06:58 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपी झिशान अख्तर पोलिसांच्या ताब्यात

बाबा सिद्दिकी यांच्या हत्याप्रकरणातील फरार असलेल्या आरोपी झिशान अख्तरला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. कॅनडा पोलिसांनी त्याला अटक केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. बनावट पासपोर्टच्या आधारे झिशान अख्तर कॅनडात पोहोचला होता अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबई पोलीस झिशान अख्तरला ताब्यात घेण्याची माहिती वरिष्ठ पातळीवर घेत आहेत.

8 Jun 2025, 06:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: ‘ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा’

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्र येण्याचा निर्णय घ्यावा.. त्यात आम्ही काहीही बोलणार नसल्याची प्रतिक्रिया  दोन्ही बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीय.

8 Jun 2025, 06:55 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: शेतकरी, दिव्यांगांसाठी बच्चू कडू मैदानात; आजपासून आमरण उपोषण

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आजपासून  आमरण उपोषण करणार आहेत.. शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6 हजार रुपये मानधन द्या यासह विविधी मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. अमरावती शहरातील गाडगे बाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोझरी अशी 15 ते 20 हजार लोकांची बाईक रॅली काढून गुरुकुंज मोझरी येथे ते सभा घेणार आहेत.. त्यानंतर अन्नत्याग आदोलन सुरु होईल.. त्यामुळे बच्चू कडू यांच्या मागण्यांवर सरकार विचार करणार का? याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.

8 Jun 2025, 06:54 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: शिवसेना UBTचं मिशन मुंबई महापालिका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईतील निरीक्षकांची मातोश्रीवर आज दुपारी बैठक होणार आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षानं मुंबईत निरीक्षक नेमले आहेत… त्यांना विविध विभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे… त्यांच्याकडून महापालिका तयारीचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक बोलावण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे युतीच्या चर्चे संदर्भात यात चर्चा होण्याची शक्यता आहे.

8 Jun 2025, 06:53 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील मान्सूनची वाटचाल रखडलेलीच…आता 15 जूननंतरच राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज…तर शेवटच्या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता

8 Jun 2025, 06:53 वाजता

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon