विधानपरिषदेसाठी भाजपची तीन नावं ठरली, माधव भंडारींचं नाव दिल्लीला पाठवलं, अन्य दोन नावंही समोर!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलाय.

मुंबई : निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषदेच्या (Vidhanparishad) 5 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 10 मार्चपासून अर्जाला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीमधील आमदारांच्या जागांवर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपासह सध्या शिवसेनेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असून 27 मार्चला या पाच जागांसाठी मतदान होणार आहे. त्यात, भाजपच्या 3 आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या खात्यात प्रत्येकी एक-एक जागांसाठी ही निवडणूक (Election) होत आहे. आता, उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये, भाजपकडून (BJP) तीन नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. त्यानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय पक्षांत वेगवान घडामोडी घडत आहेत. भाजपकडून विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यातआली आहे. विशेष म्हणजे भाजपकडून तीन उमेदवार परिषदेच्या रिंगणात असणार आहेत. त्यामध्ये, महाराष्ट्र भाजपकडून दिल्लीसाठी दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तीन निष्ठावंत नेत्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. या तीन नेत्यांची नावे दिल्लीला पाठविण्यात आल्याचे समजते. दरम्यान, विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील असून राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाची एक जाग आहे.

हेही वाचा

Pakistan Train Hijack मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये ‘जाफर एक्सप्रेस हायजॅक’; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon