सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी, बोलताना त्यांनी सध्याचं राजकारण, पवार कुटुंब आणि महापालिका निवडणुकांती टीका टीपण्णीवरुन भाष्य केलं.
सांगली : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (Election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. विशेष म्हणजे, सत्ताधारी महायुतीमधील भाजप नेते आणि राष्ट्रवादीचे अजित पवार हेही एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसून येतात. त्यामुळे, महापालिका निवडणुका ह्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्येच सुरू आहेत, विरोधक महाविकास आघाडीती नेते किंवा पक्षा जणू निवडणुकांतच नाही, असे चित्र पाहायला मिळत आहेत. आता, अजित पवार आणि भाजप (BJP) नेत्यांमधील टीका टीपण्णीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं. तसेच, अजित पवारांकडून पवार कुटुंब एकत्र येत असल्याबाबतचे वक्तव्य केले जाते, त्यावरूनही पाटील यांनी भूमिका मांडली.
सांगली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी, बोलताना त्यांनी सध्याचं राजकारण, पवार कुटुंब आणि महापालिका निवडणुकांती टीका टीपण्णीवरुन भाष्य केलं. सत्तेत असूनदेखील दोन पक्षातील नेते एकमेकांविरोधात टीका करतात, अगदी जोरात बोलत आहेत. भाजप नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये होत असलेली वक्तव्य पाहता विरोधकांना स्पेसच मिळू नये,यासाठी हा प्रयत्न असावा, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. म्हणजेच, भाजप नेते आणि अजित पवारांची एकमेकांवर होणारी टीका ही सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक करण्यात येत असलेलं राजकारण असल्याचेच जयंत पाटील यांनी सूचवलं आहे. मात्र, अजित पवार या षड्यंत्रात सहभागी होणार नाहीत असे मला वाटते, असेही पाटील यांनी पुढे सांगितले.
मला काहीही महिती नाही, चर्चा राज्य स्तरावर
सध्या दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे, विशेष म्हणजे अजित पवार स्वत: भाषणातून याबाबत बोलत आहेत. मात्र, यासंदर्भात सध्यातरी राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळतं. यासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत राज्यस्तरीय स्तरावर काय चर्चा सुरू आहे, याची मला कल्पना नाही. त्यामुळे, पाटील यांनी या विषयावर काहीही बोलणे टाळल्याचं दिसून येतं.
संबंधित बातम्या
यंदा सांगलीत नवा पर्याय
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत नवा पर्याय म्हणून सांगलीकर या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला स्वीकारतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. सांगली महापालिका क्षेत्रात गुन्हेगारी वाढली, नशा, ड्रग्सचे प्रमाण वाढलंय याचा सर्वसामान्य लोकांच्या मनात राग आहे. त्यामुळे, भाजपला सांगली महापालिकेत जास्त जागा मिळणार नाहीत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
लातूरकर जनता मान्य करणार नाही
लातूरमध्ये प्रचारसभेत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील असं म्हटलं होतं. त्यावरुन, आता जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विलासराव देशमुख यांचं नाव विसरायला लावू असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणायचं धाडस करत असतील तर, या लोकांमध्ये खासगीत काय चर्चा होत असतील याचा अंदाज या वक्तव्यावरून येतो. विलासराव यांच्यावर केलेले वक्तव्य लातूरकर जनता मान्य करणार नाही, असेही पाटील यांनी म्हटले.



