Matoshree Drone: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीबाहेर ड्रोन घिरट्या घालताना दिसत आहेत. आता नेमकं प्रकरण काय आहे? चला जाणून घेऊया…

ठाकरे घराण्याचे वांद्रे येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात अचानक ड्रोन घिरट्या घालत असल्याची माहिती समोर आली आहे. हे ड्रोन कोणी उडवले आहेत? त्यामागचा हेतू नेमका काय आहे? असे अनेक प्रश्न लोकांना पडले आहेत. मातोश्री परिसरात ड्रोनच्या अचानक घिरट्या घालतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता नेमकं सत्य काय आहे? हे देखील समोर आले आहे.
मातोश्री आणि एमएमआरडीए कार्यालयाच्या मधल्या रस्त्यावर हे ड्रोन (Drone) घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. हे ड्रोन मातोश्रीमधील सुरक्षारक्षकांच्या दृष्टीस पडले. त्यावेळी त्यांनी हवेत उडणाऱ्या या ड्रोनचा व्हिडीओ शुट केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ड्रोनच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप ठाकरे गटातील नेत्यांनी केला. पण, पोलिसांनी यावर स्पष्टीकरण देऊन हे चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मुंबई पोलिसांनी दिले स्पष्टीकरण
मातोश्री परिसरात ड्रोन फिरताना आढळले होते त्यावर आता मुंबई पोलिसानी स्पष्टीकरण दिलेले आहे. एमएमआरडीएने परवानगी घेऊनच बिकेसी आणि खेरवाडी परिसरात ड्रोन उडवले आहेत.
संबंधित बातम्या
मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये?
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून, मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये? असा सवाल उपस्थित केला होता. “ड्रोन धोरणात मुंबई रेड झोनमध्ये समाविष्ट आहे. मग सध्या ‘मातोश्री’ निवस्थानाबाहेर मात्र असे ड्रोन सर्रास दिसायला लागले आहेत. हाय सेक्युरिटी झोन असलेल्या ‘मातोश्री’च्या परिसरात असे ड्रोन दिसणे ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. मातोश्रीवर कोणी टेहळणी तर करत नाहीये?” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.