Sharad Pawar news: शरद पवार यांना 14 फेब्रुवारीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, आठवडाभरातच त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे.
Sharad Pawar news: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समस्त कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी आधारवड असणाऱ्या शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती पुन्हा एकदा काहीशी बिघडली आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात (Ruby Hall Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काहीवेळापूर्वीच शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. शरद पवार नुकतेच पाच दिवस रुग्णालयात राहून घरी परतले होते. मात्र, आता त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल आले आहे. (Pune News)
प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांना काहीसा अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांना सलाईन लावली जाईल, अशी माहिती आहे. अशक्तपणा वगळता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे अनेक दिवस बारामतीमध्ये होते. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. यादरम्यान, अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांच्या छातीत कंजेशन झाल्यामुळे पवारांना बारामतीवरुन पुण्याला आणण्यात आले होते. शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. तेव्हा शरद पवारांना अचानक त्यांना खोकला आणि कफचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर डॉक्टरांचं एक पथक घरी येऊन तपासणी करून गेले. त्यानंतर त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते पाच दिवस रुबी रुग्णालयात होते. पाच दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले होते. तेव्हापासून शरद पवार हे पुण्यातील निवासस्थानी होते. मात्र, आता त्यांना पुन्हा एकदा अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.










