टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Beed Accident News: मनोज जरांगेंचे उपोषण सुटल्यानंतर दुःखद घटना, अंतरवालीहून परतताना उभ्या ट्रकला कारची धडक; मराठा आंदोलकाचा मृत्यू, दोघे गंभीर

Beed Accident News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर अंतरवाली सराटीहून परतीच्या प्रवासादरम्यान इंदापूर येथील मराठा बांधवाचा मृत्यू झालाय. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Beed Accident News: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आंदोलन संपवून इंदापूरकडे परत जाणाऱ्या मराठा आंदोलकांवर बीडमध्ये काळाने भीषण घाला घातला आहे. परतीच्या प्रवासादरम्यान आंदोलकांच्या चारचाकी वाहनाने एका उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) इंदापूर येथील एका मराठा आंदोलकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बीड जवळील मांजरसुंबा परिसरात घडला आहे.

Beed Accident News: उभ्या ट्रकला चारचाकीची जोरदार धडक

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण मागे घेतल्यानंतर काल रात्री हा अपघात घडला. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इंदापूर तालुक्यातील रामचंद्र शंकर जमदाडे (Ramchandra Shankar Jamdade) हे आपले सहकारी संतोष माने आणि बिपीन मोरे यांच्यासह अंतरवाली सराटी येथे गेले होते. आंदोलन संपवून रात्री उशिरा कारने घरी परतत असताना, बीडमधील मांजरसुंबा (Manjarsumba) येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला त्यांच्या चारचाकी वाहनाने पाठीमागून भीषण धडक दिली.

Beed Accident News: इंदापूरच्या आंदोलकाचा मृत्यू, बीडच्या समन्वयकांची धाव

या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारमधील रामचंद्र शंकर जमदाडे यांचा गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू (Death) झाला. तर संतोष माने आणि बिपीन मोरे हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. हे तिघेही इंदापूर तालुक्यातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच बीडमधील मराठा समन्वयकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली आणि दोन्ही जखमींना बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बीडच्या मराठा समन्वयकांनी या जखमींच्या संपूर्ण उपचाराची जबाबदारी घेतली आहे.

Beed Accident News: शासकीय मदत आणि नोकरीची मागणी

या दुर्दैवी घटनेमुळे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण मराठा समाजात मोठी शोककळा पसरली आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी झालेल्या एका आंदोलकाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने बीडमधील मराठा समन्वयकांनी मृत रामचंद्र जमदाडे यांच्या कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे,” अशी मागणी सरकारकडे केली आहे. बीड पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

दुकानाबाहेर बेवारस बॅग, पोलीस धावले, मुंबईत मोठी खळबळ

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका, 24 तासांत TMC च्या दोन बड्या खासदारांवर जीवघेणा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत

यालाच म्हणतात मस्ती… डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोने खळबळ, इराणसोबतच्या चर्चेदरम्यानच..

रुग्णालयात दाखल होताच मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा, म्हणाले आता सरकारने…

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी! तब्बल इतक्या लाख महिलांना 1500 रुपये मिळणार नाहीच, सरकारचा मोठा निर्णय

Donald Trump : अमेरिका- इराण शांतता करारावर सस्पेन्स कायम, डोनाल्ड ट्रम्प यांचा होर्मुझवरील दावा इराणनं खोटा ठरवला, युद्ध थांबणार की भडकणार?