टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Ashok Kharat : नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्…

Ashok Kharat : कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील 4.48 हेक्टर म्हणजे सुमारे 11 एकरांपेक्षा अधिक जमीन अशोक खरात यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे.

28 मार्च 2024 रोजी झालेल्या या व्यवहाराची किंमत तब्बल 2 कोटी 40 लाख 91 हजार 200 रुपये इतकी असल्याची नोंद खरेदीखतात आहे. या व्यवहारात अशोक खरातची पत्नी कल्पना अशोक खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आलेले असल्याचेही खरेदी खतात नमूद आहे. विशेष म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार कळमण गावात जमिनीचे साधारण भाव हे प्रति एकर 5-6 लाख रुपये प्रति एकर आहेत. मात्र भोंदू अशोक खरात याने तब्बल 21 ते 22 लाख रुपये प्रति एकर ही जमीन खरेदी केली आहे.(Ashok Kharat)

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण हद्दीत पत्नीच्या नावे जमीन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियोजित शक्तिपीठ महामार्ग कळमण हद्दीतून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने भोंदूबाबा अशोक खरात याने ही जमीन खरेदी केली असल्याची शक्यता आहे.(Ashok Kharat)

Kalpana Kharat Missing: कल्पना खरात कुठे गायब? 10 दिवसांपासून पोलिसांना चकवा 

भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता त्याच्या पत्नीचा, म्हणजेच कल्पना खरातचा (Kalpana Kharat) शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाने (SIT) कंबर कसली आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात नाशिकमधील (Nashik) राहत्या घरून फरार झाली आहे. 10 दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती ठोस काहीही लागले नसल्याने, आता तपास यंत्रणेने तिचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि घरगुती नोकरांकडे तपासाचा मोर्चा वळवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीच्या पथकाने कल्पना खरातच्या नाशिकमधील काही जवळच्या मैत्रिणींची चौकशी केली आहे. तसेच, खरातच्या घरी सध्या काम करणारे आणि यापूर्वी काम सोडून गेलेल्या नोकरांकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्पना नेमकी कोणाच्या संपर्कात होती किंवा ती कुठे आश्रय घेऊ शकते? या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

Who is Kalpana Kharat: कोण आहे ही कल्पना खरात?

कल्पना खरातचे मूळ नाव सुनीता शिंदे आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पाडळी हे तिचे जन्मगाव. तिचे प्राथमिक शिक्षण पाडळी गावात सातवीपर्यंत झाले, तर माध्यमिक शिक्षण ठाणगाव येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात झाले. 1993 साली तिचा विवाह अशोक खरातशी झाला आणि सुनीता शिंदेची ‘कल्पना खरात’ झाली. दोन मुली आणि एक मुलगा असा तिचा परिवार असून, अशोक खरातच्या काळ्या साम्राज्यात तिची मोठी भागीदारी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 08 जून 2026 | सोमवार

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

Solar Storm Alert : सूर्यावरील प्रचंड स्फोटाचा आज पृथ्वीला तडाखा; भारतात ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता, नासाकडून सतर्कतेच इशारा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार

Horoscope Today 8th June 2026 : वाट पाहणं संपणार, आता सुखाचे दिवस येणार.. या राशींच्या नशिबाची किल्ली फिरली !