नाशिकमधील कथित कॅप्टन अशोक खरात हा एक भोंदू बाबा निघाला असून त्याने अनेक महिला व श्रीमंत नागरिकांची फसवणूक करत लैंगिक शोषण केले आहे. अधिकारी, उद्योगपती आणि राजकारणीही त्याच्या जाळ्यात अडकले. ५ लाखांची फी घेऊन किंवा ९० लाखांची गाडी स्वतःच्या नावावर करून त्याने करोडो रुपये उकळले. एसआयटी तपास करत असून त्याचे आणखी काळे कारनामे समोर येत आहेत.

नाशिकमधील कथित कॅप्टन अशोक खरात हा भोंदू बाबा निघाला असून त्याच्या जाळ्यात अडकलेल्या, लैंगिक शोषण, फसवणूक झालेल्या अनेक महिला व नागरिक समोर आले असून त्याचे काळे कारनामे उघड झाले आहेत. सध्या एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून भोंदू खरातीच पोलीस कोठडीची मुदत उद्या संपणार आहे. खरात याच्या भक्तगणांमध्ये अनेक बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारण्यांचाही समावेश होता. अशोक खरात याचे बहुतांश भक्त हे श्रीमंत, आर्थिकदृष्ट्या सुस्थितील असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्यापैकी काही भक्त हे भोंदू खरातला आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी न्यायचे, त्याचं मार्गदर्शन त्यांना हवं असायचं.
मात्र या व्हिजीटसाठी देखील खरात बक्कळ पैसे उकळायचा. आऊट डोअर व्हिजीट असले तर खरात हा संबंधित लोकांकडून 5 लाख रुपये फी घ्यायचा अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उकळायचा लाखो रुपये
भोंदू खरातचे अनेक भक्त, त्यांच्यापैकी काहींना त्याचा सल्ला, मार्गदर्शन हव असायचं. त्यासाठ ते लोकं त्याला आपल्या घरी बोलवायचे, व्यवसाय जिथे चालतो तिथे न्यायचे. त्या ठिकाणी जाण्यासाठी खरात हा त्या लोकांकडून 5 लाख रुपये फी घ्याययचा. जी व्यक्ती जास्त पैसे देईल, भोंदू खरात हा त्याच्यासोबत जायचा असंही एसआयटी तपासातून आता उघड झालं आहे. पुण्यामधील अशाच एका करोडपती भक्ताला अशोक खरात याने पूजा करण्यासाठी गाडी हवी, असे सांगून 90 लाखांची महागडी कार खरेदी करायला लावली होती. ही कार अशोक खरात याने स्वत:च्या नावावर करुन घेतली होती असंही समोर आलं आहे. खरातच्या नवनव्या कारनाम्यांची माहिती उघड होत असून त्यामुळे खळबळ माजली आहे.
शिर्डीतील चार एकर भूखंड खरेदी प्रकरणी खरातवर गुन्हा दाखल
दरम्यान शिर्डीतील चार एकर भूखंड खरेदी प्रकरणी भोंदू अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूळ जमून मालक रावसाहेब गोंदकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. जमिन खरेदी व्यवहारा फसवणुक केल्याप्रकरणी अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात , शिर्डी येथील मध्यस्थी अरविंद बावके , किरण सोनवणे आणि अशोक तांबे अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देत जमीन बळकावल्याचा फिर्यादीत आरोप आहे. फसवणूक आणि सावकारकी अधिनियमांतर्गत शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिर्डीत भोंदू खरातची कोटयवधींची मालमत्ता असून सर्व व्यवहारांची SIT कडून चौकशी होत आहे.








