Ashadhi Wari 2025 : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने येत असताना लाखो भाविकांना निवासाच्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पालखीतळ मजबूतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

Ashadhi Wari 2025
1/7

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे हळुहळू पंढरपूरच्या दिशेने येत असताना या लाखो भाविकांना निवासाच्या ठिकाणी चिखलाचा त्रास होऊ नये यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व पालखीतळ यांचे मजबूतीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
2/7

यावर्षी पालखी प्रस्थानापूर्वीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने सर्वत्र पाऊस आणि चिखल याचा त्रास होण्याची भीती भाविकांना होती.
3/7

याचाच विचार करून सोलापूर जिल्ह्यातील सर्व पालखीतळांचे मजबूतीकरण करण्यात आले असून जवळपास एक फूटापेक्षा जास्त उंचीचा खडी आणि मुरमाचे थर या पालखीतळांवर देण्यात आलेले आहेत.
4/7

त्यावर पाणी मारून रोलिंग केल्याने आता पालखी तळाच्या जागा अतिशय मजबूत झाल्या आहेत. या पालखीतळांच्या मजबुतीकरणासाठी जवळपास तीन कोटी रुपयांचा मुरूम आणि खडी याचा वापर करण्यात आला आहे.
5/7

पालखी तळावर दरवर्षी येणाऱ्या अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी यंदा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार हे मजबूतीकरण करण्यात आले असून प्रत्येक पालखीतळावर सिमेंटचे रस्ते रस्त्याला बॅरिगेटिंग पुरेसा प्रकाशासाठी विजेचे खांब अशा मूलभूत सुविधा यावेळी मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहेत.
6/7

ज्यामुळे पालख्या जेव्हा या पालखीतळावर मुक्कामासाठी पोचतील तेव्हा कोणत्याही प्रकारच्या चिखलाचा त्रास भाविकांना जाणवू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे.
7/7

त्यामुळे यंदा पालखी मार्गात कितीही पाऊस झाला तरी पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना कोणताही त्रास जाणवणार नाही अशी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे .