टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Kalburgi Crime News: बायकोला मार मार मारलं, मग गाडीखाली झोपवून अंगावरुन फिरवली, फिरायला गेलेल्या दाम्पत्याच्या वादाने टोक गाठलं, हादरवणारी घटना

Kalburgi Crime News: गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जात असताना पतीने पत्नीला कारमधून ओढून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडले.

बारामती/कलबुर्गी: कौटुंबिक वादातून पतीने आपल्या २८ वर्षीय पत्नीची अमानुषपणे हत्या केल्याची घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात घडली आहे. गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जात असताना पतीने पत्नीला कारमधून ओढून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडले. या हृदयद्रावक घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

Kalburgi Crime News: नेमकी घटना काय?

बारामती येथील हे दाम्पत्य दर्शनासाठी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात गेले होते. गाणगापूरकडे प्रवासादरम्यान बल्लुरगी गावाजवळ पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, पतीने रागाच्या भरात पत्नीला धावत्या कारमधून खाली ओढले आणि रस्त्यावरच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आधी अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर अंगावरती गाडी घालून चिरडलं.

Kalburgi Crime News: नागरिकांची मध्यस्थी अन् पुन्हा हल्ला

हा धक्कादायक प्रकार पाहून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. काही वेळ नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार काही स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. नागरिक तिथे असेपर्यंत आरोपी शांत असल्याचे भासवत होता, मात्र नागरिक बाजूला होताच त्याने क्रूरतेचा कळस गाठला.

Kalburgi Crime News: पत्नीला कारखाली चिरडले

मारहाणीमुळे रस्त्याच्या कडेला पडलेल्या पत्नीवर आरोपी पतीने थेट कार चढवली. अत्यंत अमानुषपणे कार खाली चिरडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन या २८ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने पतीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Kalburgi Crime News: पोलिस कारवाई आणि तपासाचे वळण

घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातील माहितीनुसार, ही घटना केवळ रागाच्या भरात घडलेली नसून ती पूर्वनियोजित (Pre-planned) असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

विश्वासघाताचा कळस: स्वतःच्याच मालकाला लुटणाऱ्या ड्रायव्हरचा सांगोला पोलिसांनी केला पर्दाफाश; चौघे जेरबंद

सांगोल्यात भीषण अपघात: अनियंत्रित टमटमने बैलगाड्यांना उडवले; एका महिलेसह बैलाचाही जागीच मृत्यू

सांगोल्यात मध्यरात्रीचा थरार! दरोडेखोरांनी कोल्हापूरच्या कुटुंबाला लुटले; अडीच लाखांसह मुद्देमाल लंपास

Parbhani Accident : स्विफ्ट कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा भयंकर अंत, बहीण-भावाची भेट अधुरीच!

Pimpri Chinchwad Accident: काळाचा घाला! लेह-लडाखवरून परतताना पिंपरीतील 3 मित्रांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात; 30 फूट खोल दरीत कार कोसळून मृत्यू

Solapur Accident: जीवलग मित्र चहा प्यायला गेले, पण भीषण अपघातात जागीच मृत्यू; कारचा चेंदामेंदा, कुटुंबाचा आक्रोश