टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Almatti Dam : अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र

Follow Us:

Devendra Fadnavis : अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर कृष्णा खोऱ्यातील पिके, मालमत्ता, जीवन आणि उपजीविकेला धोका निर्माण होऊ शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे.

मुंबई : कर्नाटकने जर अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणाची उंची वाढवू नये अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय लशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना केली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक पत्र लिहून ही विनंती केली. या धरणाच्या बॅक वॉटर आणि पूरस्थितीवर अभ्यास सुरू असून त्याचा अहवाल येईपर्यंत उंची वाढवण्याच्या निर्णय अविवेकी ठरेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी, रुरकी यांच्याकडून अलमट्टी धरणाचे बॅक वॉटर आणि कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थितीवर अभ्यास सुरू आहे. त्यामुळे या संस्थेच्या अहवालाची वाट पाहावी असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे.

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519.6 मी. वरून 524.256 मी. करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या धरणाची उंची वाढवली तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराची स्थिती गंभीर होऊ शकते. पिके, मालमत्ता, जीवन आणि उपजीविकेला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच कृष्णा खोऱ्यातील परिसरावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक सरकारने पुनर्विचार करावा आणि अलमट्टी उंची वाढविण्याचा निर्णय थांबवावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात बॅक वॉटरमुळे वाढणारा पूरधोका, नदीपात्रातील गाळ साचणे, वाहतूक क्षमतेवर होणारा परिणाम आणि बंधाऱ्यांमध्ये साचणारा गाळ यासह पूरस्थितीची गंभीरता स्पष्ट केली आहे.

अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर दोन्ही राज्यातील नदीकाठच्या गावांना त्याचा फटका बसणार आहे. नदीकाठच्या लोकांवर त्याचे परिणाम होणार आहेत. त्यामुळे धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाचा कर्नाटक सरकारने पुनर्वनिचार करावा अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 All Candidate List: 10 जागा, 10 उमेदवार…भाजपपासून, शिवसेना, राष्ट्रवादीपर्यंत…, विधान परिषदेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!

मुंबई पायधोनी प्रकरण: बिर्याणी की कलिंगड? तज्ज्ञांनी सांगितले फूड पॉइझनिंगचे खरे कारण

अन् पोपट ठरला वन्यप्राणी… देशातील असा खटला ज्यामुळे सर्वांनी खाजवले डोके, शेतकरी तब्बल 10 वर्ष लढला; काय घडलं असं?

अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी विमान मालकाच्या खात्यात 9 कोटी, दुसऱ्या दिवशी त्याहून मोठी… रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ

Todays Gold Rate: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! सोन्याचे भाव चांगलेच घसरले, 10 ग्रॅमसाठी…

होर्मुज खाडीत भडका, रशियाने दिला अमेरिकेला चकवा, होर्मुज खाडीतून थेट 4710 कोटी रुपयांचे..