निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Ajit Pawar: अजित पवार यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या नेत्यांना उमेदवारी देण्यासंदर्भातही भाष्य केले. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आधी स्वत:ची उमेदवारी यादी तपासावी, म्हणजे त्यांना कळेल.

Ajit Pawar PMC Election 2026: राज्यातील काही महानगरपालिकांच्या निवडणुकीत शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र आल्याने दोन्ही राष्ट्रवादी (NCP) एकत्र होणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकारात्मक असे सूचक संकेत दिले आहेत. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, असे अजित पवार यांनी म्हटले. ‘एबीपी माझा’च्या ‘कॉफी विथ कौशिक’ या पॉडकास्टमध्ये अजित पवार यांनी याबाबत भाष्य केले.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनी एकत्र यायचे की नाही, याचा विचार अजून मी केलेला नाही. सध्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. त्यामुळे रोज उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यंत खूप कामं असतात. त्यामुळे या सगळ्या गोंधळात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याबद्दल अजून मी विचार केलेला नाही. पण साधारण दोन्ही पक्षांचे खालचे कार्यकर्ते यामुळे समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय जीवनात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, एवढंच मी सांगतो. यावरुन काय ओळखायचंय ते ओळखा, असे सूचक विधान अजित पवार यांनी केले.

या पॉडकास्टमध्ये अजित पवार यांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार याच्यावर झालेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपाबाबतही भाष्य केले. मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल येण्यास इतका उशीर का लागत आहे, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. यावर अजितदादांनी म्हटलेकी, चौकशी समिती अहवाल सादर करायला मुदतवाढ का मागत आहे, हे मला माहिती नाही. अहवाल कधी येणार, हे मी कसं ठरवणार. चौकशी करत असताना तुम्ही खोलात जावे लागते. माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार मुंढव्यातील जी जमीन आहे, तिच्या खरेदी-विक्रीचा व्यवहारच होऊ शकत नाही. मी 35 वर्षे प्रशासनात आहे. कोणालाही माझ्या कामाची पद्धत विचारा. मी आजपर्यंत कोणालाही चुकीचं काम करण्यासाठी दबाव आणला का, हे विचार करा. मला या सगळ्याची माहिती असती तर मी हा व्यवहार होऊनच दिला नसता, असे अजित पवार यांनी सांगितले.

Pune Mahanagarpalika Election 2026: पुणे महानगरपालिकेच्या कारभारावरुन अजितदादांचा भाजपवर निशाणा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या कारभारावरही निशाणा साधला. पुण्यात 10 वर्षांपूर्वी पिक अवरमध्ये ज्याठिकाणी जायला 10 मिनिटं लागायची, तिथे आता दीड तास लागतो. या वाहतूक कोंडीत सामान्य माणसांच्या आयुष्यातील तीन-तीन तास जातात. अशाने पुणेकर त्रासून जाणार नाहीत का? नुसती कामं सुरु आहेत, असे सांगितले जात आहे, पण ही कामं होणार कधी, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. गेल्या पाच वर्षांत पुण्यात खड्डे बुजवण्यासाठी 1150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पुण्याच्या विकास कामांसाठी पाऊण लाख कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी फक्त 650 कोटी खर्च करण्यात आले,500 कोटी रुपयांचा निधी तसा पडून राहिला, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon