Air India Plane Crash In Ahmedabad: अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवाशी बचावला आहे. रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता.
1/8

Air India Plane Crash In Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबाद येथे काल (12 जून) झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातात 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात विमानातील 241 प्रवासी तर विमान ज्या भागात कोसळलं तिथल्या 24 जणांचा मृत्यू झाला.
2/8

अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे उड्डाण केल्यावर अवघ्या 12 ते 15 सेकंदात हा भीषण अपघात झाला. विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे.
3/8

अहमदाबाद विमान अपघातात एक प्रवाशी जिंवत बचावल्याचे समोर आले आहे. विमानातील 11 अ या सीटवर बसलेला प्रवासी वाचल्याची माहिती अहमदाबाद पोलिसांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिली आहे. या प्रवाशाचं नाव रमेश विश्वकुमार असं आहे.
4/8

पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातातून एक व्यक्ती जिवंत बचावली आहे.
5/8

रमेश विश्वकुमार असे या व्यक्तीचे नाव असून तो 11A या सीट नंबरवर बसला होता. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची टीम त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे.
6/8

रमेश विश्वकुमार हे 40 वर्षांचे असून ते या विमान अपघातातून बचावले आहेत. त्यांनी या घटनेची माहिती देताना म्हटलं की विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर 30 सेकंदात मोठा आवाज सुरु झाला अन् विमान क्रॅश झालं, हे खूप वेगानं घडलं, असं रमेश विश्वकुमार म्हणाले.
7/8

रमेश विश्वकुमार ज्या सीटवर बसले होते ती 11A सीट विमानाच्या दरवाजाजवळ होती. एअर इंडियाच्या विमानाच्या पुढच्या भागात बिझनेस क्लास आहे. त्यानंतर इकॉनॉमी क्लासच्या सीट्स आहेत.
8/8

बिझनेस आणि इकॉनॉमी क्लासमध्ये एक दरवाजा आहे. सीट क्रमांक 11A ही दरवाज्याजवळून सुरू होते. त्यानंतर 11B, 11C, 11D, 11E, 11F या सीट्स आहेत.
