उपाध्यक्षपदी अॅड.नवनाथ खट्टे, सचिवपदी अॅड.शरद साळुंखे तर सहसचिव पदी अॅड.अनुष्का कांबळे
सांगोला :- सांगोला विधीज्ञ संघाच्या सन 2026-27 सालाच्या पदाधिकार्यांची निवडणूक नुकतीच पार पडली. अत्यंत चुरशीच्या व खेळमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या निवडणुकीत विधीज्ञ संघाचे अध्यक्षपदी अॅड.विशालदिप विजयसिंह बाबर यांची विक्रमी मताधिक्यांनी निवड झाली.
त्याचप्रमाणे उपाध्यक्षपदी अॅड.नवनाथ नामदेव खट्टे यांची सचिव पदी अॅड.शरद विलास साळुंखे, सहसचिव पदी अॅड.अनुष्का ज्ञानेश्वर कांबळे यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आली.
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.अशोक बाळासाहेब गव्हाणे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.जालिंदर दत्तात्रय साळुंखे यांनी काम पाहिले तर निवडणुक प्रक्रियेसाठी अॅॅड. सुप्रिया विकास बोत्रे व अॅड.अमोल यशवंत जाधव यांनी देखील सहकार्य केले.
नवीन पदाधिकार्यांच्या निवडी जाहीर झाल्यानंतर सांगोला विधीज्ञ संघाच्या ज्येष्ठ सदस्यांचा हस्ते नूतन पदाधिकार्यांच्या सत्कार संपन्न झाला.
सांगोला विधीज्ञ संघाचेे नूतन अध्यक्ष अॅड.विशालदिप बाबर यांनी आपण आपले अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सर्व ज्येष्ठ सदस्यांसह विधीज्ञ संघाचे सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन ज्येष्ठ सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सोबत घेऊन कामकाज करणार आहोत. आमच्या सर्व नूतन पदाधिकार्यांचा कार्यकाळ यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व विधीज्ञ संघ सदस्यांनी सहकार्य व मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा व्यक्त करून निवडून दिल्याबद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.







