क्रेनच्या साहाय्याने ट्रॉलीमध्ये अडकलेली कार बाहेर काढली आणि त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कारचे दरवाजे तोडून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यासाठी कारचे इतर भाग वेगळे केले.
Accident : राष्ट्रीय महामार्ग-27 वर कार आणि मालवाहू ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात दाम्पत्य आणि त्यांच्या मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. कारमधील सातही जण गुजरातमधील अहमदाबादहून जालोरला परतत होते. एका महिलेवर गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सातही जण राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. राजस्थानच्या सिरोही जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला. गुजरातमधील अहमदाबादहून जालोरला परतत असताना गुरुवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास अबू रोड परिसरातील किवरली येथे कार आणि ट्रॉलीची धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन गंभीर जखमींना अबू रोड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे गंभीर जखमी दोघांचा मृत्यू झाला. प्राथमिक उपचारानंतर एका महिलेला गंभीर अवस्थेत सिरोही येथे रेफर करण्यात आले.
पती, पत्नी आणि मुलाचा मृत्यू
या भीषण अपघातात नारायण प्रजापत (58), त्यांची पत्नी पोशी देवी (55) आणि मुलगा दुष्यंत (24, रा. कुम्हार का बस) यांचा मृत्यू झाला. यासह कार चालक काळुराम (40), यशराम (40) आणि पुखराज प्रजापत यांचा मुलगा जयदीप यांनाही जीव गमवावा लागला, तर पुखराजची पत्नी दरिया देवी (35) यांच्यावर सिरोही येथे उपचार सुरू आहेत. कारमध्ये जालोर येथील रहिवासी असलेले एकूण सात जण प्रवास करत होते. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
क्रेनच्या साहाय्याने ट्रॉलीमध्ये अडकलेली कार बाहेर काढली
या भीषण अपघाताची माहिती मिळताच माउंट अबूचे डीएसपी गोमाराम चौधरी, सदर पोलीस स्टेशनचे अधिकारी दर्शन सिंह पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. रात्रीच्या गस्तीदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर उपस्थित असलेले हेडकॉन्स्टेबल विनोद लांबा यांनी अपघाताचा आवाज ऐकून तातडीने घटनास्थळ गाठून रुग्णवाहिका व अधिकाऱ्यांना माहिती दिली. अपघातात कारचा चक्काचूर होऊन अपघातग्रस्त अडकले होते. यानंतर पोलीस पथकाने क्रेनच्या साहाय्याने ट्रॉलीमध्ये अडकलेली कार बाहेर काढली आणि त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने कारचे दरवाजे तोडून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्यासाठी कारचे इतर भाग वेगळे केले. सुमारे 40 मिनिटांच्या प्रयत्नानंतर कारमधून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले, जे अबू रोड सरकारी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत. त्याचवेळी तीन जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले, त्यापैकी आणखी दोघांचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या
सकल मराठा समाजाच्यावतीने रविवारी सांगोला बंद
Heatstroke : उन्हाळ्यात उष्मघातापासून बचाव करण्यासाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो