ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, शेतकऱ्याचा खर्च 70 टक्के कमी होणार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Subsidy on Electric Tractor : डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या हाती फारसं काही उरत नाही. शेतीकामात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केल्यास खर्चात 60 ते 70 टक्के कपात होणार आहे.

Maharashtra Subsidy on Electric Tractor : राज्यात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या विक्रीला चालना मिळावी म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या कामासाठी जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची खरेदी केली तर त्यांना दीड लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या खर्चात कपात व्हावी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील इंधनाच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे. वाढत्या डिझेलच्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ होत आहे. पण तुलनेने उत्पन्न मात्र तेवढं मिळत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे अनुदान दीड लाख रुपये इतके आहे.

 

Subsidy on Electric Tractor : सरकारची ही नवीन योजना काय आहे? 

डिझेलचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची मशागत महागात पडत आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची सबसिडी देखील देणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने शेतीमध्ये नवीन क्रांती होईल. शेतकऱ्यांनी जर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर खरेदी केले तर त्यांना राज्य सरकार दीड लाख रूपयांची सबसिडी देखील देणार आहे. यासोबतच राज्य सरकारच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत (Annasaheb Patil Economic Development Corporation) ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्ज देखील दिले जाईल.

Electric Tractor Subsidy In Maharashtra : खर्च 60 ते 70 टक्क्यांनी कमी होणार

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचा वापर केल्याने ऑपरेटिंग खर्च 60 ते 70 टक्क्यांपर्यंत कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या राज्यातील अनेक भागात नांगरणीसाठी 1500-2000 रूपये प्रति एकर खर्च येतो. पण इलेक्ट्रिक ट्रँक्टरने हा खर्च कमी होऊ शकतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon