खडीने भरलेल्या भरधाव डंपरची बसला भीषण धडक; खडीखाली गाडल्याने तब्बल 20 जणांचा जीव गेला, मृतांमध्ये सर्वाधिक विद्यार्थ्यांवर काळाचा घाला

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Telangana Rangareddy Accident: रंगारेड्डीच्या चेवेल्ला पोलिस स्टेशन परिसरातील खानपूर गेटजवळ डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बसचा चक्काचुर झाला.

Telangana Rangareddy Accident: तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात खडीने भरलेल्या भरधाव डंपरने एका आरटीसी बसला धडक दिली. या भीषण धडकेत 20 जणांचा खडीखाली दबून मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बस तंदूरहून हैदराबादला जात होती. रविवारी घरी सुट्टी घालवून हैदराबादमधील त्यांच्या महाविद्यालयात परतणाऱ्या 70 हून अधिक प्रवासी त्यात होते. रंगारेड्डीच्या चेवेल्ला पोलिस स्टेशन परिसरातील खानपूर गेटजवळ एका वेगाने जाणाऱ्या डंपरच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि बसला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की बसचा चक्काचुर झाला. डंपरमध्ये भरलेली खडी बसमधील प्रवाशांवर कोसळली गेली त्यामध्ये अनेक गाडले गेले.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले. त्यांनी अपघाताची संपूर्ण माहिती मागितली. त्यांनी मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांना जखमींना तातडीने हैदराबादला पोहोचवण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले.

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon