दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 29 ऑक्टोबर 2025 | बुधवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  1. नागपूर खंडपीठाने दिलेली वेळ संपली: बच्चू कडू यांचे आंदोलन सुरूच; म्हणाले- आम्ही आंदोलन स्थळ सोडू, पण आमची व्यवस्था तुरुंगात करा

  2. देवेंद्र फडणवीस चोरून मुख्यमंत्री झाले: हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल, कर्जमाफीची घोषणा करण्याची सरकारकडे केली मागणी

  3. राहुल म्हणाले- मोदी मतांसाठी नाचू शकतात: ट्रम्पना घाबरून ऑपरेशन सिंदूर थांबवले; त्यांनी म्हणावे हे खोटे आहे

  4. विजय वडेट्टीवार यांना आयकरची नोटीस: ओबीसी मोर्चाच्या घोषणेनंतर तपास यंत्रणांच्या रडावर, काँग्रेस नेत्याचा सरकारवर गंभीर आरोप

  5. सरकारकडून चर्चेचे दरवाजे उघडेच, पण बच्चू कडू बैठकीला येतच नाहीत,चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य, सरकारकडून आशिष जयस्वाल बच्चू कडूंशी चर्चा करणार 

  6. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, 60 पेक्षा जास्त वय असलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाही, नव्या चेहऱ्यांना संधी देणार

  7. कोणाच्याही भरवशावर राहू नका, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी तयार राहा,विनाकरण मुंबईत राहू नका,अजित पवारांची पक्षातील आमदारांना तंबी 

  8. डॉक्टर तरुणीच्या हातावरील आणि पत्रातील निरीक्षक शब्दाच्या वेलांटीकडे लक्ष वेधलं, सुषमा अंधारेंचा पत्रकार परिषदेतून नवा दावा, रुपाली चाकणकरांवर हल्लाबोल 

  9. फलटणमधील डॉक्टर तरुणीने जीवन संपवण्याआधी फोटो काढला, लटकवलेल्या ओढणीचा सेल्फी प्रशांत बनकरला पाठवल्याची सूत्रांची माहिती

  10. मृत डॉक्टर तरुणीच्या मोबाईलमधील पुरावे डिलिट केले नाहीत, सायबर तज्ज्ञांकडून तपासणी सुरु, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषींची माहिती

  11. डॉक्टर तरुणीची हत्या नाही तर आत्महत्या,आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु,मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले यांचा दावा

  12. फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या की हत्या?: सुसाईड नोटमधील अक्षर वेगळे असल्याचा सुषमा अंधारेंचा दावा, तपासावर गंभीर संशय व्यक्त

  13. लाडक्या बहिणींना शेवटची संधी,ई-केवायसीची मुदत 18 नोव्हेंबरला संपणार, त्यापूर्वी ई-केवायसी पूर्ण करा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंचं आवाहन 

  14. एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरातील घरी चोरी, घरातून ‘ती’ सीडी अन् पेनड्राईव्ह गायब; नाथाभाऊंच्या दाव्याने खळबळ

  15. पुण्यात एटीएसची कारवाई, उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर जुबेर हंगरगेकरला अटक, बॉम्ब तयार करण्याची माहिती असणारं पुस्तक सापडलं

  16. भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट: मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत एक डेमो देणार, कनेक्टिव्हिटी सर्वत्र उपलब्ध असेल

  17. लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला: यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार

  18. माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार: 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार; रेवंत सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री असतील

  19. काँग्रेसने म्हटले- मोदींची 56 इंच छाती आकुंचन पावली: ट्रम्प 56 व्या वेळी भारत-पाक युद्धबंदीत मध्यस्थीचा दावा करतात, तरीही मोदी गप्प

  20. भारतीय शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स 85 हजारांच्या उंबरठ्यावर, निफ्टी 26 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले 

  21. भारत पाकिस्तान संघर्षात सात नवीन आणि सुंदर विमानं पाडली गेली, भारत-पाक युद्ध थांबवल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा दावा

  22. भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी 20 सामना पावसामुळे रद्द, 31 ऑक्टोबरला खेळला जाणार दुसरा सामना

  23. वनडेचा राजा रोहित शर्मा,आयसीसी क्रमवारीत पहिलं स्थान पटकावले, शुभमन गिलला टाकले मागे

  24. ज्युनियर हॉकी विश्वचषकात पाकची जागा घेणार ओमान: 28 नोव्हेंबरला तामिळनाडूमध्ये सुरू होतेय स्पर्धा; पाकिस्तानने आधीच माघार घेतलीय

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon