जागतिक वारसास्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर आता फुलांचा रंगोत्सव सुरू झाला आहे. श्रावण सरी कोसलळ्यानंतर येथील पठारावर विविध रंगबेरंगी फुलांची चादर पसरल्याचं दिसून येत आहे.
1/8

जागतिक वारसास्थळ असलेल्या साताऱ्यातील कास पठारावर आता फुलांचा रंगोत्सव सुरू झाला आहे. श्रावण सरी कोसलळ्यानंतर येथील पठारावर विविध रंगबेरंगी फुलांची चादर पसरल्याचं दिसून येत आहे.
2/8

सातारा-पश्चिम घाटातील जैवविविधता खूप मोठ्या प्रमाणात या कास पठारावर आढळते. ऑगस्ट महिन्यापासून या कास पठारावरील फुलांचा बहर पहायला मिळतो.
3/8

मात्र यावर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक दुर्मिळ फुलांनी हे कास पठार फुलायला सुरुवात झाली आहे.
4/8

महत्वाच्या 132 फुलांच्या जातींपैकी तेरडा, सीतेची असवे, धनगरी फेटा, मिकी माऊस, कंदील पुष्प आणि चवर ही विविध रंगांची फुले येऊ लागली आहेत.
5/8

संपूर्ण पठार फुलांनी अच्छादण्यासाठी अद्यापही थोड्या दिवसांचा अवधी असणार आहे. यावर्षी येणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनामार्फत आगळ वेगळं आकर्षण ठेवण्यात आलं आहे.
6/8

यंदा कास पठारवर येणाऱ्या पर्यटकांना बैलगाडी सफर करण्याचा आनंद घेता येणार आहे, यामधून पर्यटकांना कुमोदिनी तलावापर्यंत फेरफटका मारता येईल.
7/8

आधीच रंगबेरंगी फुलांनी सजलेल्या कास पठारावर बागडणाऱ्या फुलपाखरांना पाहून हे निसर्ग सौंदर्य आणखी खुललं आहे. त्यामुळे, कास पठाराच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत.