सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील नामवंत खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 9 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत खंडागळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड, सांगोला येथे डॉ परेश खंडागळे मित्रपरिवार सांगोला तालुका व शहर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
तरी या रक्तदान शिबिरामध्ये सांगोला तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलकडून करण्यात आले आहे.