अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील स्ट्रेट ऑफ होर्मूज अजूनही व्यापारी जहाजांसाठी बंदच आहे. याचदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे, या बातमीमुळे चिंता वाढली असून, याचा थोट फटका हा भारताला बसणार आहे.

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला आहे, मात्र तरी देखील संघर्ष थोडा देखील कमी झालेला नाहीये. उलट अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखी वाढल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिका आणि इराणमध्ये शांती वार्ताच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. युद्धावर काही तोडगा निघाणार का यासाठी संपूर्ण जगाचं लक्ष सध्या अमेरिका आणि इस्त्रायलकडे लागलं आहे. दरम्यान जर या युद्धावर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर संपूर्ण जगावर मोठं ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान स्ट्रेट ऑफ होर्मूज अजूनही बंदच आहे.
अमेरिका आणि इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे या युद्धाचे गंभीर परिणाम आता समोर येत आहेत, ज्याचा फटका हा संपूर्ण जगालाच बसला आहे. भारताला तर सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर देखील इराणने स्ट्रेट ऑफ होर्म होर्मूज बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर या परिसरात अमेरीकेनं देखील नाकेबंदी केली. अमेरिकेच्या नाकेबंदी नंतर इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा एकदा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र अमेरिकेने येथील नाकेबंदी उठवण्यास नकार दिला, त्यामुळे पुन्हा एकदा इराणने हा मार्ग व्यापारी जहाजांसाठी बंद कोला.
स्ट्रेट ऑफ होर्मूज अजूनही व्यापारी जहाजांसाठी बंद आहे, याचा मोठा परिणाम आता जाणवू लागला आहे. गेल्या 24 तासांमध्ये या मार्गाने केवळ 5 व्यापारी जहाजंच गेले आहेत. याचा मोठा परिणाम हा कच्च्या तेलच्या किमतीवर झाला आहे. कच्च्या तेलच्या किंमती थेट 16 टक्क्यांनी वाढल्या आहेत, तसेच अनेक देशांमध्ये कच्च्या तेलाचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे.
दरम्यान याचा सर्वाधिक फटका हा भारताला बसण्याची शक्यता आहे. कारण भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार देश आहे. जर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर याचा मोठा फटका हा भारताला बसू शकतो. तसेच जर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंदच राहिलं तर भविष्यात पुन्हा एकदा कच्चं तेल आणि एलपीजी गॅसचा तुटवडा जाणवू शकतो. कच्च्या तेलाच्या किंमती एक झटक्यात 16 टक्क्यांनी वाढल्यामुळे आता भारताला महाग दराने कच्च तेल खरेदी करावं लागणार आहे.














