टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा राडा, सत्काराच्या कार्यक्रमात दोन गट भिडले

Follow Us:

Eknath Shinde Shivsena : राज्यात झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दमदार कामगिरी केली. पण काही ठिकाणी अजूनही पक्षामध्ये मतभेद, कुरबुरी आहेत.

Eknath Shinde Shivsena : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा राडा, सत्काराच्या कार्यक्रमात दोन गट भिडले

चार वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं. शिवसेनेतील आमदारांचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला. उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 10 ते 15 आमदार राहिले. पुढे जाऊन निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची व्याप्ती मोठी आहे. राज्यातील अनेक भागात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा विस्तार झाला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागलं.

त्यानंतर राज्यात झालेल्या नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दमदार कामगिरी केली. पण काही ठिकाणी अजूनही पक्षामध्ये मतभेद, कुरबुरी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवनियुक्त बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांच्या समोरच शिवसेनेच्या दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आलीय. सुरूवातीला बाचाबाची वरून प्रकरण धक्काबुक्की वर गेले. यामुळे शिंदे शिवसेनेत गटबाजी असल्याचे उघड झाले असून मतभेद असल्याचे समोर आलं आहे. देऊळगाव राजा येथे काल एका हॉटेल मध्ये शिंदे यांच्या शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित केली होती.

आजी-माजी पदाधिकारी समोरासमोर भिडले

ही बैठक नवनियुक्त जिल्हा संपर्कप्रमुख संजय सोनार यांचे उपस्थितीत आयोजीत केली होती, या बैठकीला माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर सह पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. काही माजी पदाधिकाऱ्यांना बैठकीला निमंत्रण नसल्याने बैठक सुरू असताना त्यांनी सभागृहात प्रवेश करत घोषणाबाजी केली तसेच नवनियुक्त संपर्क प्रमुख सोनार यांचा सत्कार करण्यास आजी पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. त्यामुळे एका गटात असंतोष पसरल्याने आजी-माजी पदाधिकारी समोरासमोर भिडले आणि शिंदे शिवसेनेत गटबाजी असल्याचे चव्हाट्यावर आले. महत्वाचे म्हणजे सेनेच्या एका गटाने माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या राजकीय कार्यप्रणालीवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने बाचाबाची झाली.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Maharashtra Live News : दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर, ओमराजे निंबाळकर की संजय जाधव कोणाला मिळणार मंत्रिपद, घडामोडींना वेग..

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

Dattatray Bharne: देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले…

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम