टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Petrol Diesel Price hike: विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?

Follow Us:

Petrol Diesel Price hike: सरकारी कंपन्यांना दिवसाला 2400 कोटींचा तोटा, पेट्रोल-डिझेलचा भाव वाढणार? इंधनाचा भाव किती रुपयांनी वाढणार, येत्या काही दिवसांत निर्णयाची शक्यता

एप्रिल 2022 पासून शासकीय इंधन कंपन्यांनी दर वाढवलेले नाहीत. या कंपन्यांना पेट्रोल प्रतिलिटर 18 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 35 रुपये तोटा सहन करावा लागतो , अशी माहिती सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली आहे. इंडियन ऑइल , भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम अशा शासकीय कंपन्यांनी एप्रिल 2022 पासून किंमती वाढवलेल्या नाहीत. एप्रिल 2022 पासून पेट्रोल – डिझेलच्या किंमती शासकीय कंपन्यांनी स्थिर ठेवल्या आहेत.

रशिया युक्रेन युद्ध , मध्य आशियातील युद्ध परिस्थितीत कधी कच्च्या तेलाची किंमत 120 डॉलर्स प्रति बॅरल गेली तर कधी 70 डॉलर्सवरही आली, पण भारतात पेट्रोल डिझेल किंमतीमध्ये कोणतेही बदल झाले नव्हते. गेल्या महिन्यात दिवसाला काही कंपन्यांना 2400 कोटीचे नुकसानही सहन करावे लागले होते. सरकारने उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कंपन्यांनी तोट्याचे गणित सावरले आहे. परंतु सरकारी कंपन्यांना हा भार फार काळ पेलता येणार नाही. त्यामुळे पेट्रोल – डिझेलच्या किंमती पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर वाढवल्या जातील, असा अंदाज भारतीय अर्थविश्वात व्यक्त केला जातो आहे. इंधनाचे दर वाढल्यास दैनंदिन जीवनातील अनेक वस्तूंचे भाव वाढू शकतात. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Petrol and Diesel rates: पेट्रोल आणि डिझेलचा सध्याचा भाव किती?

पेट्रोलचे भाव

दिल्ली- 94.77
हैदराबाद- 107.46
कोलकाता- 105.41
मुंबई- 103.50
बंगळुरू- 102.92
चेन्नई- 101.06

डिझेलचा भाव

दिल्ली- 87.67
हैदराबाद- 95.70
कोलकाता- 92.02
मुंबई- 90.03
बंगळुरू- 90.99
चेन्नई- 92.61

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now